मुंबईचा फौजदार, देवता, जिवा सखा, पानिपत अशा अनेक दर्जेदार मराठी व हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचे आकस्मित निधन झाले. ते ७७ वर्षांचे असून काही महिन्यांपासून ते पुण्यात राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या आकस्मित निधनाने मराठी मनोरंजनसृष्टी शोकसागरात बुडाली. (ravindra mahajani death reason)
सूत्रांच्या माहितीनुसार, रवींद्र महाजनी हे काही दिवसांपासून पुण्यात राहत होते. त्यावेळी त्यांच्या राहत्या घरामधून दुर्गंधी येत असल्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना देताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला असता तिथे महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. महाजनी यांचा दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. रवींद्र महाजनी यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी व अन्य कुटुंबीय आहेत.
बेळगाव येथे जन्मलेला हा कलाकार मुंबई येथे आपलं नशीब आजमावण्यास आला. शालेय जीवनापासून अभिनयाची आवड असलेले रवींद्र महाजनी कालांतराने प्रसिद्ध अभिनेते म्हणून नावारूपास आले. मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि ‘झुंज’ या चित्रपटात रवींद्र महाजनींना मुख्य भूमिकेची संधी मिळाली. हा चित्रपट खूप गाजला आणि रवींद्र महाजनी नावाचा सुपरस्टार मराठी सिनेसृष्टीला मिळाला होता. (ravindra mahajani)
रवींद्र महाजनी यांनी लक्ष्मी, देवता, मुंबईचा फौजदार, देऊळ बंद, पानिपत अशा अनेक मराठी व हिंदी सिनेमे केले असून मराठी सिनेसृष्टीतील विनोद खन्ना म्हणून ओळखले जायचे. ईश्वर यांच्या आत्म्यास शांती देवो. (ravindra mahajani passed away)