बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘डंकी-ड्रॉप ४’ मुळे बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर व त्यातील गाणी सध्या चांगलीच गाजत आहे. त्यात नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री तापसी पन्नू, अभिनेता बोमन इराणी, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातही शाहरुख त्याच्या ‘जवान’ चित्रपटाप्रमाणे तरुण व वृद्ध अशा दोन बाजूंच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. पण या चित्रपटातील काही बाबी आहेत ज्या चित्रपटाला कमकुवत करताना पाहायला मिळत आहेत. (Dunki drop 4 movie three trouble points)
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आत्तापर्यंतचे जे काही संवाद लिहीले गेले आहेत ते संवाद हास्यास्पद वाटत नाहीत. यातील विनोदी संवाद हे अगदी साधे व हलक्या स्वरूपाचे लिहिलं असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटाला अपेक्षित विनोदीपण पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर अभिनेत्री तापसी पन्नू व विकी कौशल हे पंजाबी कुटुंबातील दाखवण्यात आले आहेत. पण ‘डंकी’च्या ट्रेलरमध्ये ते दोघं अगदी हलक्याफुलक्या अंदाजात पंजाबी बोलाताना दिसत आहेत. मात्र त्यांचा अभिनय या चित्रपटाचा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
त्याचबरोबर शाहरुखचे यावर्षी ‘पठाण’ व ‘जवान’ चित्रपटांमध्ये अगदी वेगळ्या अंदाजात, लूकमध्ये पाहायला मिळाला होता. पण या चित्रपटात त्याचं पात्रं हे काही खास VFX इडीट झालेले दिसत नाहीत. यामुळे त्याचा अंदाज ‘जीरो’ चित्रपटातील बउआ सिंह या त्याच्या भूमिकेची आठवण करुन देतं. या सर्व गोष्टींची कमतरा वाटत असली तरीही शाहरुखचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय करतो आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे.
हा चित्रपट २१ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चार मित्रांच्या अनोख्या प्रवासाचं वर्णन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या कथेत सर्व वेगवेगळ्या भावना एकाच फ्रेममध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात मित्रांचा प्रवास पंजाबमधून लंडनपर्यंतचा संपूर्ण आव्हानात्मक आहे. त्याचबरोबर तो त्या सगळ्यांचं जीवन बदलून टाकणारा आहे. त्यामुळे हा प्रवास प्रत्येकालाच पाहायला आवडेल अशी आशा आहे. आता शाहरुखच्या चाहत्यांना चित्रपटाची आतुरात लागून राहिली आहे.