बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे चित्रपटांची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहताना दिसतात. यावर्षी त्याच्या ‘पठाण’ व ‘जवान’ चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई केली होता. आता त्यानंतर शाहरुख यावर्षीचा तिसरा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच त्याच्या ‘डंकी:ड्रॉप ४’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. शाहरुखने पोस्ट शेअर करत चाहत्यांबरोबर हा ट्रेलर शेअर केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सध्या चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटात शाहरुखचा त्याच्या ‘पठान’, ‘जवान’ या चित्रपटातील लूकपेक्षा हटके अंदाजात पाहायला मिळणार आहे. (movie dunki trailer out now)
शाहरुखने त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट हा ट्रेलर शेअर केली आहे. याला कॅप्शन देत तो लिहितो, “ही गोष्ट ललटूपासून मी सुरु केली होती. याचा शेवटही मीच माझ्या मित्र परिवाराबरोबर करणार. डंकीचा ट्रेलर तुम्हाला राजू सरांच्या दूरदृष्टीतून सुरु होणारा प्रवास दाखवतो. हा चित्रपट तुम्हाला मैत्रीच्या वेडेपणापर्यंत घेऊन जाईल”, असं लिहीत त्याने चित्रपटाचा थोडक्यात आराखडा मांडला आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला चित्रपटाच्या कथेची सुरुवात १९९५पासून होते. राजकुमार यांच्या काल्पनिक सुंदर जगाची झलक ट्रेलरमधून प्रेक्षकांना पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये शाहरुखचा ट्रेनमधील सीनही पाहायला मिळातो आहे. हा सीन पाहता त्याच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाची आठवण चाहत्यांना नक्कीच झाली असेल. ट्रेलरची सुरुवात खूप जबरदस्त आहे जी चित्रपटाच्या कथेला पुढे वळण देण्यास पूरक ठरते. शाहरुखचं या चित्रपटात हार्डी हे पात्र दिसणार आहे. जो पंजाबमधील लालटू गावात पोहोचतो. जिथे त्याची मैत्री मनू, सुखी, बग्गू व बल्ली यांच्याबरोबर होते. या सगळ्यांच एकच स्वप्न असतं ते म्हणजे लंडनला जाणं. या व्हिडीओत सगळ्यांचे इंग्रजीचे वांदे असल्याचंही पाहायला मिळतं. विकी कौशलचाही हटके अंदाज यातून पाहायला मिळत आहे.
‘डंकी’ चित्रपटाच्या कथेत सगळी वेगवेगळ्या स्वभाव गुणांची पात्र सुंदररित्या एकत्र आणलेली दिसत आहेत. त्यात त्यांच्या मैत्रीचा अद्भूत प्रवास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात या मित्रांची पंजाबमधून लंडनला जाण्यासाठीचे प्रयत्न त्यातील आव्हाने हे सगळं चित्रपटात रंजक वळण आणणारं आहे. यात दाखवलेली पात्र अगदी साधी दाखवण्यात आली आहे. ज्यांना फक्त सीमेच्या पार जायचं आहे. परदेशात जाण्याची इच्छा पुढे त्यांना हातात बंदूक घेण्यासाठी भाग पाडते ही या कथेतील रंजक बाब आहे. शाहरुखसह या चित्रपटात तापसी पन्नू, अभिनेते बोमन इराणी, विकी कौशल, विक्रम कोचर व अनिल ग्रोव्हर हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहता प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढलेली पाहायला मिळत आहे.