सध्या सोशलमीडिया वर जुने फोटोज पोस्ट करणायचा ट्रेंड अगदी जोरदार सुरु आहे. अनेक मराठी सेलिब्रिटी हा ट्रेंड फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेलिब्रिटींच्या आताच्या ग्लॅमर्स अंदाजानंतर त्यांच्या या जुन्या फोटोज वरून त्यांना ओळखताच येत नाही.अनेक कलाकार त्यांच्या जुन्या फोटोज पेक्षा खूप वेगळेच दिसतायत.तर काही कलाकारांच्या फोटोज मध्ये साम्य दिसून येते.(Swati Deval)
पहा कोण आहे ही अभिनेत्री ? (Swati Deval)
असाच, एका अभिनेत्रीने तिचा १९९७ मधील एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवरून तुम्ही तिला ओळखलंत का? तर ही आहे अभिनेत्री स्वाती देवल. तिच्या या फोटोला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे तर अभिनेत्री प्रार्थना बेहरे ने सो प्रिटी अशी कमेंट देखील केली आहे.
हे देखील वाचा : गर्ल चिलींग इन समर… रिंकूचा समर लुक तुम्ही पाहिलात का ?
अनेक मालिका, नाटक, चित्रपट यात स्वातीने विविध भूमिका केल्या आहेत. सध्या तिची गाजलेली भूमिका म्हणजे झी मराठी वरील माझी तुझी रेशीम गाठ मालिकेतील नेहा ची मीनाक्षी वाहिनी.या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका केली होती. आणि तिची ही खलनायिका प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरली.(Swati Deval)
तसेच स्वाती ही संगीत दिगदर्शक तुषार देवल याची पत्नी आहे. ती तिच्या सोशलमीडिया वरून बरेच फोटो ,मजेशीर रील आणि डान्सचे व्हिडिओ देखील शेअर करत असते.नुकतंच तिने तिचा एक डान्स व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओ वर देखील प्रेक्षकांनी कमेंट करून तीच कौतुक केलं आहे.(Swati Deval)