ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतुन अपूर्वा नावाने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थंकर हिची भूमिका प्रेक्षकांना फार आवडत आहे. तिने यात साकारलेली अप्पू निरागस आणि नटखट अंदाजात आपण पहिली आहेच.(Dnyanada Ramtirthkar Photoshoot)

पण ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यात तितकीच क्युट, बिन्दास्त आणि बबली आहे. सख्या रे ही ज्ञानदाची पहिली मालिका होती, धुरळा या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटात पहिले पाऊल टाकले. ज्ञानदाचे फोटोशूट नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ज्ञानदा फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर फोटोशूटचा व्हिडियो तसेच फोटो पोस्ट केले आहेत. यात ती हॉट आणि सुंदर दिसत आहे. या पोस्टला ज्ञानदान Beach Please असे कॅप्शन दिले आहे. (Dnyanada Ramtirthkar Photoshoot)
हे देखील वाचा: ‘आणि जेव्हा चाहते कलाकाराला लिफ्ट देतात’ कोल्हापूरकरांचा फॅन झाला अभिनेता उत्कर्ष शिंदे
ज्ञानदाच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी Beach beauty तसेच Stunning अशा कमेंट्स देखील केल्या आहेत. या फोटोजसाठी ज्ञानदाने डेनिमचं जॅकेट आणि जीन्स वेअर केली आहे. ज्ञानदाने हे फोटोशूट समुद्र किनाऱ्यावर केलं असल्याने ज्ञानदाचे फोटो तिच्या चाहत्यांना मोहिनी घालतायत. (Dnyanada Ramtirthkar Photoshoot)
हे देखील वाचा: झगा मगा नि मना बघा..लवकरच होणार हिंदीत प्रदर्शित
ज्ञानदा ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आधी सख्या रे आणि शतदा प्रेम करावे या दोन्ही मालिकेत या पूर्वी झळकली आहे. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका एकत्र कुटुंब कोणत्याही संकटात एकमेकांसोबत कसे उभे राहते हे सांगणारी ही मालिका आहे. या मालिकेत ज्ञानदा मुख्य भूमिका साकारत आहे. ज्ञानदाचे शिक्षण पुण्यात झाले असून ज्ञानदा मूळची सांगलीची आहे. ज्ञानदा नशीब अजमण्यासाठी मुंबई मध्ये आली होती. ज्ञानदाने शादी मुबारक या हिंदी मालिकेत काम केले आहे.