बऱ्याचदा होत असं कि कलाकाराला गर्दीत घेरणारा फॅन कधी कधी कलाकाराच्या मदतीस ही धावून येतो. असाच काहीस घडलंय अभिनेता उत्कर्ष शिंदे सोबत. मागील काही दिवसांपासून आपण इंस्टाग्राम वर उत्कर्ष, प्रवीण तरडे, जय दुधाने, सिद्धार्थ जाधव, यांसह अन्य कलाकारांचे काही जिम मधील व्हिडिओ चांगलेच व्हायरल होताना पाहतोय. ही सगळी मंडळी सध्या कोल्हापूर मध्ये असून आगामी बहुचर्चित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त आहेत.(Utkarsh Shinde Rides WIth Fan)
त्यातच आज सकाळी जिम मधून सेटवर जात असताना उत्कर्षची कार बंद पडली त्यावेळी उत्कर्षला सेल्फी काढण्यासाठी थांबलेल्या फॅन्स पैकी काहींनी सर काय मदत करू का असं म्हणत उत्कर्षला सेट वर घेऊन जाण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली. आणि उत्कर्षने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वर फॅन्स सोबत स्कुटी वरून कोल्हापूरच्या रस्त्यांवरून फिरतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आणि त्या चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.

काय आहे उत्कर्षची पोस्ट(Utkarsh Shinde Rides WIth Fan)
उत्कर्ष ने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि ‘“नको व्हायला शूटिंग ला लेट -म्हणून निघालो फॅन्स च्या स्कुटिवर थेट “कोल्हापूर रांगड्या मातीतल्या मवाळ प्रेमळ माणसांच शहर. तर झाल असं ,वीरदौडले सात ह्या आमच्या आगामी फिल्मची शूटिंग कोल्हापुरात सुरु असताना .वेळ मिळताच आम्ही जिम साठी धावतो ,नेहमी प्रमाणे प्रोडूकशन ची कार सोबत असतेच पण त्या दिवशी फोर्ज फिटनेस कोल्हापूर मधून निघालो आणि कार चा प्रॉब्लेम झाला ..मग काय आता शूटिंग ला लेट होतं कि काय ह्या टेन्शन मध्ये असतानाच “सर आम्ही काही मद्दत करू का म्हणत तितक्यात काही फॅन्स सेल्फी काढण्या साठी आलीच होती आम्ही ड्रॉप करतो चला सर लेट नाही होऊदेणार .आणि मग काय त्या दोन्ही मित्रांनी मला आणि माझ्या सोबतीच्या कलाकाराला लिफ्ट दिली.
हे देखील वाचा – दारू पिऊन वैदेहीचा धिंगाणा कावेरी उतरवणार वैदेहीची नशा!
स्कुटी वर डबल सीट तेही फॅन्स च्या बरोबर तेही कोल्हापुरात अशी वेगळीच मज्जा अनुभवली .शिंदेशाहीचे फॅन्स फक्त प्रेमळच नाही तर जीव लावणारे आहेत.हे नवं नव्या अनुभवातून दरवेळेस मला दिसतच .कलाकार फॅन्स चे मन जिकंतो म्हणून फॅन्स ची गर्दी होते ,फॅन्स सेल्फी घेतात ,ऑटोग्राफ घेतात पण काही फॅन्स वेगळे असतात तेही त्या कलाकारच मन जिकतात.असेच हे दोन कोल्हापूर मधील दोन फॅन्स ज्यांनी माझं मन जिंकला .ह्या कोल्हापूरच्या मातितच वेगळी आपुलकी आहे .सदैव माझ्या मनात वेगळी छाप असेल ह्या शहराची.छत्रपतींनचा सहवास प्रेम लाभलेलं हे शहर रांगड्या कणखर पण तितकेच प्रेमळ मऊ मनाच्या माणसंच.#शिंदेशाही सलाम ह्या कोल्हापूरला माझा’

उत्कर्ष शिंदे अभिनय करत असलेला हा आगामी चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांच्या गाथेवर चित्रित केला जाणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर हे करत असून चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलीवूड मधील खिलाडी म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता अक्षय कुमार साकारणार आहे.