जत्रा या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्याच्या तालावर सगळ्यांनाच थिरकायला लावणारी अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरला ओळखले जाते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.यामुळे ती कायम चर्चेत असते. ती कुटुंबातील प्रत्येक क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवते. नुकतंच तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला, विशेष म्हणजे या व्हिडिओत ती जेवणाचा आस्वाद घेताना दिसते.तसेच हा व्हिडीओ तिच्यासाठी खास आहे.(kranti redkar)
या व्हिडिओत तिच्या ताटात साधं जेवण पाहायला मिळतंय. पण हे संपूर्ण जेवण तिच्या आईने बनवले आहे.म्हणून तर क्रांती जेवणाचा आनंदाने आस्वाद घेते. तुम्ही कितीही जग फिरलं..कितीही मोठ्या हॉटेलमध्ये जेवला तरी आईच्या हातच्या जेवणाची सर..चव जगात कशालाच येत नाही. हे जेवण म्हणजे स्वर्ग… आईच्या हातची साधी मुगाची आमटी आणि भात….माझ्यासाठी स्वर्ग आहे. आता मी मस्त जेवणार आहे..असं ती म्हणताना दिसत आहे. तर तिच्या या व्हिडिओला,तुम्ही खूप नशीबवान आहात की, आईचं प्रेम जेवणाच्या रूपात मिळतं?,अश्या अनेक कमेंट करत अनेक चाहत्यांनी सहमती दर्शवली आहे.(kranti redkar)
हे देखील वाचा – दारू पिऊन वैदेहीचा धिंगाणा कावेरी उतरवणार वैदेहीची नशा!
या सोबतच मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरला ओळखलं जात.जत्रा, ऑन ड्युटी २४ तास, माझा नवरा तुझी बायको, नो एन्ट्री पुढे धोका आहे. यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले .तिच्या कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली.. या गाण्याची भुरळ सगळ्यांना पडली.या गाण्यावर आजवर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना थिरकायला लावणारी अभिनेत्री क्रांती रेडकर अभिनेत्रीसोबतच दिग्दर्शिका म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.काकण या चित्रपटाचं दिग्दर्शनही क्रांतीने केले होते.शहाणपण देग देवा, फक्त लढ म्हणा, खो-खो, रॉकी अशा अनेक चित्रपटात क्रांतीने काम केले.तसेच ति अजय देवगणसोबत प्रकाश झा यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट गंगाजलमध्ये दिसली आहे.यासोबतच ती रेनबो हा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.