शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘अरुण तेव्हाही वाक्य विसरायचा’ केदार शिंदेनी सांगितला अरुण कदम यांचा मजेदार किस्सा

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मे 11, 2023 | 9:08 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Arun Kadam Kedar Shinde

Arun Kadam Kedar Shinde

सध्या रंगभूमीवर विविध क्षेत्रात व्यस्त असलेले कलाकार कधी काळी एकमेकांच्या सुख दुःखाच्या काळात सोबत उभे होते हे हे तितकंच खरं आहे. जुन्या मित्रांची अशीच एक जोडी म्हणजे दिगदर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अरुण कदम. केदार शिंदे यांनी आजोबा आणि लोकशाहीर म्हणजे प्रसिद्ध असलेले शाहीर साबळे यांच्या जीवनप्रवासावर आधारित महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित केला आणि प्रेक्षकांचा त्याला भरभरून प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय. चित्रपटाच्या प्रमोशन साठी महाराष्ट्र शीर चित्रपटाची टीम नुकतीच महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या मंचावर गेली होती त्यावेळी अरुण कदम आणि केदार शिंदे यांची भेट झाली. भेटी दरम्यान काही जुन्या आठवणींना उजाळा देत केदार शिंदे यांनी एक पोस्ट लिहिली आहे.(Arun Kadam Kedar Shinde)


पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिलं आहे ‘बरेच दिवस झाले या आमच्या मित्राविषयी अरूण विषयी लिहायचं होतं. पण जमलंच नाही. महाराष्ट्र शाहीर च्या प्रमोशनसाठी #महाराष्ट्राचीहास्यजत्रा मध्ये गेलो होतो. त्यावेळेच्या हा खास फोटो. अरूण आणि माझी मैत्री १९९० पासून. माझ्या अनंत सुखदुःखात तो महत्वपूर्ण भूमिकेत होता. आमच्या सगळ्यांमध्ये लवकर सेटेल होणारा, घसघशीत कमाई करणारा पहिला अरूणच. आर्थिक विवंचना असल्यावर हातात पैसे ठेवणारा अरूणच.

कित्येक दिवस मी त्याच्या बीएमसी ॲाफिसात काढल्या आहेत. त्याच्या जीवावर पोट भरलं आहे. आमच्यात वयाने खुप मोठा पण, त्याची मस्करी करताना ते कधीच डोक्यात येत नाही. गण गवळण बतावणी आम्ही दोघं लोकधारामधे सादर करायचो. त्याच्या डोळ्यात दिसायचं की, पुढचं वाक्य तो विसरला आहे. पण अविर्भाव असा असायचा की, समोरचा वाक्य विसरला आहे. आता आम्ही एकत्र फार काम करत नाही. पण त्याची प्रगती पाहून अभिमान वाटतो. आत्ताच्या पिढीतील मुलांसोबत तो त्याच उर्जेने काम करतो हे पाहून मन भरून येतं. खुप शुभेच्छा अरूण.'(Arun Kadam Kedar Shinde)

Tags: arun kadamentertainmentits majjakedar shindemaharashtra shahir songmaharashtrachi hasy jatramarathi malikamarathi moviemarathi serialmhjsony marathi
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Girija Prabhu Viral Dance

याराच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त 'चंद्रा' गाण्यावर थिरकली अभिनेत्री गिरीजा प्रभू

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.