शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत आहे दिलजीत दोसांझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “मला रोज किती टेन्शन येतं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 27, 2024 | 12:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Diljit Dosanjh Faces Lots Of Tension

आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत आहे दिलजीत दोसांझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "मला रोज किती टेन्शन येतं…"

Diljit Dosanjh Faces Lots Of Tension  : दिलजीत दोसांझ हा जगभरातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. सध्या त्याच्या ‘दिल लुमिनाटी’ टूरमध्ये व्यस्त असलेल्या दिलजीत दोसांझला आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. तेलंगणा सरकारने हैदराबादमध्ये त्याच्या मैफिलीपूर्वी त्याच्या अल्कोहोलशी संबंधित गाण्यांवर बंदी घातली तेव्हा हा वाद समोर आला. इतकेच काय तर, दिलजीतला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली होती. दरम्यान, आता गायकाने सांगितले आहे की त्याला या वादामुळे दररोज अनेक तणाव आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

दिलजीत दोसांझने नुकताच पुण्यात एक कॉन्सर्ट केला. याचा एक व्हिडीओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी दररोज येणाऱ्या समस्यांबरोबरचं योगाचे महत्त्वही उपस्थितांना सांगितले. तणावाबाबत बोलताना दिलजीत दोसांझ म्हणाला की, “आयुष्यात अडचणी येतील, तणाव येतील. मला रोज किती टेन्शन येतंय तेही सांगता येत नाही. त्यामुळे जेवढे मोठे काम तेवढे मोठे टेन्शन”. दिलजीतच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून अनेक कमेंट येत आहेत. याच व्हिडीओमध्ये दिलजीत योगाबद्दल बोलताना म्हणाला की, ‘जर एखादी व्यक्ती रोज योगा करत असेल तर त्याच्या कामाचा वेग दुप्पट होतो. कारण मग त्यानुसार गोष्टी घडू लागतात’. दिलजीतने असेही सांगितले की, ‘तो संत नाही, पण त्याला माहित आहे की जो व्यक्ती जीवनात रोज योगासने करतो तो काहीही साध्य करु शकतो’.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींच्या परीक्षेत अनुष्का पास, किर्लोस्करांची सून म्हणून स्वीकारणार का?, पारू-आदित्यचं काय होणार?

View this post on Instagram

A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh)

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत दिल्ली, हैदराबाद, लखनऊ, पुणे आणि जयपूरसह अनेक शहरांमध्ये कॉन्सर्ट केले आहेत. परदेशातही त्याने कार्यक्रम केले आहेत. आता येत्या काही दिवसांत तो कोलकाता, बेंगळुरू, चंदीगड, इंदूर आणि गुवाहाटी येथे परफॉर्म करणार आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगणा सरकारने नोटीस जारी करताना दिलजीतच्या ३ गाण्यांवर बंदी घालण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं.

आणखी वाचा – “तू म्हातारी झालीस हे स्वीकार”, नेटकऱ्याने डिवचताच ऐश्वर्या नारकर भडकल्या, उत्तर देत म्हणाल्या, “वेळ येते…”

ही नोटीस सरकारने गायक संघ आणि हॉटेल नोवोटेलला पाठवली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, दिलजीत दोसांझने हैदराबादमधील त्याच्या लाइव्ह शोदरम्यान दारू, ड्रग्स, मादक पदार्थ किंवा हिंसेला प्रोत्साहन देणारी गाणी (पंज तारा, केस आणि पटियाला पेग) गाऊ नयेत. दिलजीत दोसांझच्या विरोधात अशा गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या चंदीगड येथील प्राध्यापक पंडितराव धारनवार यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तेलंगणा सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Tags: bollywood singerdiljit dosanjhDiljit Dosanjh Faces Lots Of Tension
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi actress Urmila Kothare shared a photo from the airport with her daughter Jija on her first international trip.

उर्मिला कोठारेची लेकीसह इंटरनॅशनल ट्रीप, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष, म्हणाली, “माझी राजकुमारी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.