Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage : अभिनेते उदय टिकेकरांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. उदय टिकेकरांची लेक अभिनेत्री स्वानंदी टिकेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गायक आशिष कुलकर्णीसह अभिनेत्रीचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. काही वेळातच ही जोडी लगीनगाठ बांधणार आहे. दोन दिवसापासून स्वानंदी-आशिषच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु होती. लग्नाआधीच्या विधींचे बरेच व्हिडीओ तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता साऱ्यांच्या नजरा दोघांच्या लग्नसोहळ्याकडे लागून राहिल्या आहेत.
अशातच काल स्वानंदी व आशिषचा संगीत सोहळ्याचे जंगी सेलिब्रेशन झाले. त्यांच्या संगीत सोहळ्यातील धमाल मस्ती करतानाचा व्हिडीओ स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्वानंदी व आशिषसह त्यांचे संपूर्ण कुटुंब थिरकले पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीच्या संगीत सोहळ्याला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ची संपूर्ण टीमही उपस्थित होती.
आणखी वाचा – संगीत सोहळ्यासाठी स्वानंदी-आशिष यांचा वेस्टर्न अंदाज, झगमगीत कपडे अन् डायमंड ब्रेसलेट…
स्वानंदी व आशिषच्या संगीत सोहळ्यातील अभिनेत्रीच्या आई वडिलांच्या डान्सने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील कलाकारही बेधुंद होऊन नाचताना दिसले. सखी गोखले, जुईली जोगळेकर, सुव्रत जोशी, नचिकेत लेले, संचित चौधरी या कलाकारांचा डान्स व्हिडीओ पाहायला मिळाला. शिवाय स्वानंदी व आशिष यांचाही डान्स साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. स्वानंदी-आशिषच्या संगीत सोहळ्याच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
स्वानंदीने संगीत सोहळ्यासाठी जांभळ्या रंगाचा मोठा गाऊन परिधान केला होता. तर आशिषने काळ्या रंगाची शर्ट-पॅंट व त्यावर साजेसा असा सुंदर नक्षीकाम असलेला ब्लेझर परिधान केला आहे. त्याचबरोबर या फॉर्मल लूकवर त्याने पांढऱ्या रंगाचे शूजदेखील परिधान केले आहेत. दरम्यान स्वानंदीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातातल्या डायमंड ब्रेसलेटने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.