बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मेहंदी रंगली गं! ‘रमा राघव’ फेम अभिनेत्री सोनल पवारच्या हातावर रंगली समीरच्या नावाची मेहंदी, फोटो आले समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 28, 2024 | 10:12 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sonal Pawar Wedding

मेहंदी रंगली गं! 'रमा राघव' फेम अभिनेत्री सोनल पवारच्या हातावर रंगली समीरच्या नावाची मेहंदी, फोटो आले समोर

सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अशातच कलाविश्वातही लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अमृता देशमुख-प्रसाद जवादे, सुरुची अडारकर-पियुष रानडे, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे या जोड्या शाही थाटामाटात विवाहबंधनात अडकल्या. यांनतर आता लवकरच गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर व स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या जोड्या लगीनगाठ बांधणार आहेत. या कलाकारांच्या पाठोपाठ आता आणखी एक मराठमोळी कलाकार लग्नबंधनात अडकणार आहे. (Sonal Pawar Wedding)

छोट्या पडद्यवरील आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीही लग्नबंधनात अडकणार आहे. ‘रमा राघव’ फेम अभिनेत्री सोनल पवारच्या घरीही लगीनघाई सुरु आहे. अभिनेत्री सोनल पवारच्या मेहंदी सोहळ्यातील बरेच फोटो समोर आले आहेत. अभिनेत्री तिच्या मेहंदी सोहळ्यासाठी खास तयार झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. मेहंदी सोहळ्यातील तिच्या खास लूकनेही लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच अभिनेत्रींच्या नक्षीदार मेहंदीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

आणखी वाचा – आली लग्नघटिका समीप! गौतमी-स्वानंदच्या लग्नाचा मंडप सजला, पुण्यातील ‘या’ रिसॉर्टमध्ये पार पडणार शाही लग्नसोहळा

अभिनेत्री सोनल पवार समीर पालुष्टेसह लग्नबंधनात अडकणार आहे. समीरच्या घरीही हळदीची जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अत्यंत पारंपरिक अंदाजात हळदीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लग्नाची हळद फोडणे हा कार्यक्रम नवऱ्यामुलाच्या घरी सुरु आहे. सोनल व समीरच्या लग्नसोहळ्याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनल व समीर यांचा थाटामाटात साखरपुडा सोहळा संपन्न झाला.

आणखी वाचा – मॉडर्न अंदाजात थिरकले गौतमी-स्वानंद, संगीत सोहळ्यामधील व्हिडीओ आला समोर, पाहा खास क्षण

सोनलचा नवरा समीर हा बिझनेसमन असून स्पार्कल्स मीडिया या कंपनीचा तो फाऊंडर तसेच सीईओ आहे. याशिवाय समीर डिजीटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणुनही काम करतो. समीरला भारत सरकारच्या निवडणुक आयोगाकडून पुरस्कार ही मिळाला आहे. समीर-सोनल यांच्या साखरपुड्यानंतर चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्या साखरपुड्याच्या रोमँटिक व्हिडिओवर नेटकऱ्यांनी पसंती दर्शवत लाईक्सचा वर्षाव केला आहे. त्यानंतर आता त्यांच्या लग्नसोहळ्याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Tags: marathi actressmarathi serialrama raghavsonal pawarsonal pawar wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
swanandi tikekar and ashish kulkarnee shared sangeet photos on social media

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding : संगीत सोहळ्यासाठी स्वानंदी-आशिष यांचा वेस्टर्न अंदाज, झगमगीत कपडे अन् डायमंड ब्रेसलेट…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.