Ashish Kulkarni and Swanandi Tikekar Wedding : मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नाची चांगलीच धामधूम पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीत सध्या गौतमी-स्वानंद व स्वानंदी-आशिष यांच्या लग्नाच्या तयारीचे क्षण पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री-गायिका स्वानंदी टीकेकर व गायक आशिष कुलकर्णी हे दोघे गेले अनेक दिवस रिलेशनमध्ये होते. सोशल मीडियावर ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर काही दिवसांतच या जोडीने अगदी थाटामाटात साखरपुडा समारंभ उरकला होता आणि आता अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. (Ashish Kulkarni and Swanandi Tikekar On Instagram)
गेले दोन दिवस स्वानंदी व आशिष यांच्या लग्नाच्या विधींना सुरवात झाली असून नुकतेच त्यांच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो समोर आलेत. या खास सोहळ्यासाठी स्वानंदीने लाल रंगाचा मोठा गाऊन परिधान केला होता. तर आशिषनेही त्यावर साजेसा असा लाल रंगाचा कुर्ता व त्यावर पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता. त्याचबरोबर स्वानंदी व आशिषच्या मेहंदीसाठी करण्यात आलेली सजावटदेखील अधिक लक्षवेधी होती.
आणखी वाचा – बॉलिवूडमध्येही लगीनघाई! अरबाज खान दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात, पत्नीसह शेअर केलेल्या फोटोंनी वेधलं लक्ष
अशातच आता स्वानंदी व आशिष यांच्या संगीत सोहळ्यातील काही खास फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये स्वानंदीने निळ्या रंगाचा मोठा गाऊन परिधान केला होता. तर आशिषने काळ्या रंगाची शर्ट-पॅंट व त्यावर साजेसा असा सुंदर नक्षीकाम असलेला ब्लेझरही परिधान केला आहे. त्याचबरोबर या फॉर्मल लूकवर त्याने पांढऱ्या रंगाचे शूजदेखील परिधान केले आहेत. दरम्यान स्वानंदीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातातल्या डायमंड ब्रेसलेटने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा – मॉडर्न अंदाजात थिरकले गौतमी-स्वानंद, संगीत सोहळ्यामधील व्हिडीओ आला समोर, पाहा खास क्षण
स्वानंदी-आशिष यांनी शेअर केलेल्या या फोटोंवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. स्वानंदी-आशिष यांचे हळदी व मेहंदीच्या खास फोटोंना चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, त्यांचे अनेक चाहते आता त्यांच्या लग्नासाठी आतुर आहेत. ही जोडी कधी लग्न करणार? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.