बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सावत्र मुलीबरोबर असं आहे दिया मिर्झाचं नातं, फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांकडूनही कौतुक, म्हणाले, “स्वतःची आईही असं…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 30, 2024 | 6:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dia Mirza wished her step daughter Samaira on her 15th birthday by sharing special photo

सावत्र मुलीबरोबर असं आहे दिया मिर्झाचं नातं, फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांकडूनही कौतुक, म्हणाले, "स्वतःची आईही असं..."

बॉलीवूड विश्वातील काही सुंदर अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा. आपल्या बहारदार  अभिनयाने व मनमोहक सौंदर्याने दियाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आपल्या सौंदर्याने व अभिनयाने चर्चेत असणारी ही अभिनेत्री अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेमक स्टायलिश फोटो शेअर करत असते. आशातच तिने शेअर केलेला एक फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

दियाने तिची सावत्र मुलगी समायराला तिच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. दियाने समायराबरोबरचे काही खास फोटो शेअर करत आपल्या सावत्र मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोबरोबरच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “१५व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा. मी तुझे हृदय कायम माझ्या हृदयात ठेवते.” असं म्हणत तिने समायराला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dia Mirza Rekhi (@diamirzaofficial)

दियाने समायराबरोबरचे दोन फोटो शेअर केले आहेत. यामधील पहिला फोटो सेल्फीचा आहे. ज्यामध्ये दियाने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तर समायरानेही पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. या फोटोमध्ये दियाने डोक्यावर हिमाचली टोपी घातली आहे. तर समायरा तिच्या खांद्यावर चेहरा ठेवून मागून पोज देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दिया तिच्या मुलाबरोबर झोपलेली दिसत आहे. समायरानेही तिच्या खांद्यावर डोके ठेवले आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने पॅरिसमध्ये सेलिब्रेट केला बायकोचा वाढदिवस, रोमँटिक फोटो समोर, म्हणाला, “सोनू…”

दियाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्सद्वारे तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुला खूप खूप आशीर्वाद, देव तुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व अनेक आशीर्वाद” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर एकाने “खरी आईसुद्धा असं प्रेम करत नाही.” असं म्हटलं आहे. या कमेंट्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा – ओटी भरणाच्या कार्यक्रमात बायकोची काळजी घेताना दिसला रोनित पिसे, कार्तिकी गायकवाडचा हात हातात धरला अन्…; म्हणाला, “आगमनाची तयारी…”

२०१४ मध्ये दियाने साहिल संघाशी लग्न केले. मात्र, लग्नाच्या पाच वर्षानंतर २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. साहिलबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर दियाने उद्योजक वैभव रेखीबरोबर लग्न केले. दियाप्रमाणेच वैभवही आधीच विवाहित होता आणि त्याला समायरा रेखी नावाची मुलगीही आहे. दरम्यान, दिया नुकतीच ‘धक-धक’ चित्रपटात दिसली होती. यानंतर ती ‘IC 814: The Kandahar Attack’मध्ये दिसणार आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात पंकज कपूर, पत्रलेखा, विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह, मनोज पाहवा व कुमुद मिश्रा आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत 

Tags: bollywood actressBollywood entertainment newsDia Mirza
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Sai Lokur reacts to body trolling after her pregnancy said its such a shame see the details

“लोकांना जाड व बारीक यापलीकडे काहीच दिसेना”, शारीरिक रचनेवरुन सई लोकूरला सतत हिणावत आहेत लोक, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “एखाद्या आईने...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.