एखादा कलाकार असो वा सर्वसामान्य माणूस प्रत्येकाचं स्वतःच हक्काचं घर घेण्याचं स्वप्न हे असतं. बऱ्याच कलाकार मंडळींनी स्वतःचं हक्काचं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. तर काहींनी त्यांच्या घराची झलकही शेअर केली. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने घर घेतलं असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. अभिनेता मंगेश देसाई याने नवं घर घेतलं आहे. सोशल मीडियावरुन नेमप्लेटची झलक दाखवत त्याने ही गुडन्यूज सांगितली. (Mangesh Desai Home)
माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधत त्यांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश करत पूजा घातली असल्याचं पाहायला मिळाला. मंगेश यांनी त्यांच्या नव्या घराची नेमप्लेट दाखवत एक सुंदर व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या या नेमप्लेटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या नेमप्लेटवर मंगेश शलाका साहिल देसाई हे नांव पाहायला मिळालं. यावेळी व्हिडीओमध्ये मंगेश देसाई त्यांच्या पत्नी व मुलासह पाहायला मिळत आहेत.
यानंतर आता थेट घराची झलक दाखवत एक खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. मंगेश यांच्या नव्या घरात माघी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं. यावेळी कलाकार मंडळींसह अनेक राजकीय मंडळींनीही त्यांच्या नव्या घरी हजेरी लावत बाप्पाचं दर्शन घेतलेलं व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये त्यांच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. यांत सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या नव्या घरातील आकर्षक इंटेरिअरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या. याचबरोबर त्यांच्या या सुंदर घरातील देवघर खूपच आकर्षून घेणार वाटलं. शिवाय फुलांच्या मळणी सजवलेले घर व केलेली रोषणाई त्या घराला अधिकच सुंदर बनवत होती.
“घर म्हणजे नुसतं विटांच काम नसतं, घर पहाटेच सुंदर स्वप्नं असतं, घर नात्यांचे रेशीम बंध असतं, घर त्यात वास्तव्य करण्याचे अस्तित्व असतं आणि जेव्हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छांनी ते भरतं तेव्हा त्याला कोणाची दृष्ट लागू शकत नाही” असं कॅप्शन देत मंगेश यांनी त्यांच्या नव्या घराची झलक साखवत एक व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. यावेळी बाप्पाच्या आगमनानिमित्त आलेले पाहुणेमंडळींनी घराची शोभा वाढवलेली पाहायला मिळाली.