Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा खेळ आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाच्या या पर्वाचा १० वा आठवडा सुरु झाला असल्याचं समोर आलं आहे. १०० दिवसांचा हा खेळ आता अवघ्या ७० दिवसांवर येऊन पोहोचला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या फिनाले वीकमध्ये सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, अभिजीत सावंत ही मंडळी पोहोचली आहेत. हे पर्व सध्या विशेष गाजताना दिसत आहे. शेवटच्या टप्प्यात आता खेळ आलं असून नुकत्याच झालेल्या एलिमिनेशनमध्ये पॅडी कांबळेचा प्रवास संपला. यानंतर आता उर्वरित सात सदस्यांचा ट्रॉफीपर्यंतचा प्रवास सुरु झालेला पाहायला मिळत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, ‘बिग बॉस’ने स्पर्धकांसाठी एक नवा टास्क आणला आहे. हा टास्क पाहून आता स्पर्धकांचे खरे रंग समोर आलेले पाहायला मिळत आहे. शेवटचा एक आठवडा राहिला असून स्पर्धकांना दिलेल्या या टास्कमुळे त्यांची भंबेरी उडणार असल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस यांनी सदस्यांना स्वतःची या घरात किती किंमत आहे हे ठरवण्याचा टास्क दिला आहे. या सदस्यांनी ठरवलेल्या किंमतीवर त्यांच्यात वाद झालेला पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, “आज आपल्याला ठरवावी लागणार आहे स्वतःची या घरातील किंमत”, असं म्हणत ‘बिग बॉस’ काही रकमा लिहिलेल्या पाट्या स्पर्धकांसमोर ठेवतात. यावेळी अभिजीत स्वतःच मत देत म्हणतो, “२ लाख मी अंकिताला देईन”. यावर निक्की अभिजीतला विचारते, “आणि जान्हवीला चाळीस देणार आहेस का?”. यावर अभिजीत म्हणतो, “माझ्याकडे काहीच पर्याय नाही आहे”. तेव्हा डीपीही अभिजीत बोलतो की, “मलाही असंच वाटतंय की तू ती गोष्ट करावी”.
आणखी वाचा – दोन आठवडे रितेश देशमुखचा भाऊचा धक्का झालाच नाही, पण यामागचं नेमकं कारण काय?
यावर जान्हवी उठते आणि ती पाटी हातात घेत रागात म्हणते, “‘बिग बॉस’ या घरातील माझी चाळीस हजाराची किंमत माझी नाही आहे. त्यामुळे ही पाटी मी स्वीकारु शकणार नाही”. आता कोणत्या सदस्याला किती किंमत दिली आहे, कोणता स्पर्धक सर्वाधिक महागडा असणार आहे हे सारं आजच्या भागात पाहणं रंजक ठरेल.