शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धनुष व नयनतारा यांच्यातील वाद विकोपाला, एकमेकांचं तोंडही बघेना, एकाच कार्यक्रमात पोहोचले पण…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 22, 2024 | 12:46 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dhanush Nayanthara Ignore Each Other

धनुष व नयनतारा यांच्यातील वाद विकोपाला, एकमेकांचं तोंडही बघेना

Dhanush Nayanthara Ignore Each Other  : साऊथ अभिनेत्री नयनतारा सध्या एका विशेष वादामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल’ या माहितीपटावरुन धनुष व नयनतारा यांच्यात सध्या वाद सुरु आहेत. धनुषच्या या कमेंटनंतर नयनताराने त्यांच्यावर टीका करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या वादात नयनतारा व धनुषने नुकतीच एका लग्नाला हजेरी लावली असल्याचं समोर आलं. मात्र यावेळी दोघांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केले. चित्रपट निर्माता आकाश भास्करन यांच्या लग्नात धनुष व नयनतारा उपस्थित होते. यामध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता.

या लग्नात ते एकमेकांसमोर येतील अशी कल्पना दोघांनीही केली नसेल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये धनुष व नयनतारा लग्नाच्या मंडपात बसलेले आहेत. व्हिडीओमध्ये धनुष व नयनतारा एकमेकांची नजर टाळत होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही आणि तोंड फिरवून दोघेही बसून राहिले. धनुष व नयनतारा समोरच्या रांगेत बसले होते. धनुषची नजर समोरच्या स्टेजवर असताना नयनतारा एका पाहुण्याशी बोलताना दिसली. पण ते ना एकमेकांशी बोलले ना एकमेकांना पाहिले.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : आदित्यची लगीनघाई सुरु, अहिल्यादेवी सून म्हणून कोणाची निवड करणार?, पारूचं पुढे काय होणार?

वास्तविक, नयनताराने धनुषकडे तिच्या ‘ननम राउडी धन’ या चित्रपटातील गाणी व दृश्ये तिच्या ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल’ या माहितीपटासाठी वापरण्याची परवानगी मागितली होती. या चित्रपटात नयनताराही होती. मात्र धनुषने नकार दिला. पण नयनताराच्या डॉक्युमेंटरीमध्ये धनुषच्या चित्रपटातील तीन सेकंदांचे व्हिज्युअल वापरले गेले. धनुषने नयनतारावर चोरीचा आरोप करत तिला १० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

आणखी वाचा – “कुटुंबाबद्दल क्वचितच बोलतो पण…”, ऐश्वर्या व अभिषेकशी संबंधित अफवांवर अमिताभ बच्चन यांनी सोडलं मौन, म्हणाले, “हाताबाहेर गेलेलं…”

धनुषने नोटीस पाठवताच नयनतारा संतापली आणि तिने सोशल मीडियावर एक खुले पत्र लिहून धनुषवर टीका केली. नयनताराने पत्रात लिहिले होते की, धनुष त्याच्या वडील आणि भावामुळे कलाकार झाला, तर तिचा स्वतःचा कोणी गॉडफादर नाही. नयनताराने असेही लिहिले की, तिच्या संघर्षामुळेच ती चित्रपटसृष्टीत उभी आहे आणि यशस्वी आहे.

Tags: dhanush nayanthara fightDhanush Nayanthara Ignore Each Othersouth iindustry news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Vanita Kharat With Husband

Video : लंडनला निघाली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', एअरपोर्टवर वनिता खरातचा सोडायला आला नवरा, कॅमेऱ्यात भावुक क्षण कैद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.