Amitabh Bachchan Finally Breaks Silence On Speculations : गेल्या अनेक महिन्यांपासून बच्चन कुटुंबीयांमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. काही प्रकरणांमध्ये या चर्चा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन अंबानींच्या लग्नाला स्वतंत्रपणे आल्यापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, बच्चन कुटुंबाने आतापर्यंत सर्व अंदाज आणि वृत्तांवर मौन बाळगले आहे. अमिताभ बच्चन यांनी अखेर त्यांच्या ताज्या ब्लॉगमध्ये एक पोस्ट केली आहे ज्याने कुटुंबाबाबत सुरु असलेल्या या चर्चेकडे लक्ष वेधले आहे. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक लांबलचक नोट लिहिली. ते आपल्या कुटुंबाबद्दल जास्त बोलत नाही, असेही त्यांनी या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरू असलेल्या या अटकळांमागील सत्याबाबतही त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
बिग बींनी लिहिले, “जीवनात वेगळे राहण्यासाठी आणि त्यावर विश्वास ठेवण्यासाठी दृढ विश्वास, खूप धैर्य आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे”. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, “मी कुटुंबाबद्दल फार क्वचितच बोलतो, कारण ते माझे डोमेन आहे आणि मी त्याची गोपनीयता राखतो. अफवा फक्त अफवा आहेत, कोणत्याही पडताळणीशिवाय त्या फक्त अफवा आहेत”.बिग बींनी पुढे लिहिलं आहे की, “जे काही लिहिलं जात आहे किंवा नोंदवलं जात आहे ते आधी पडताळलं पाहिजे. लोक पडताळणीची मागणी करतात जेणेकरुन त्यांचा व्यवसायावर विश्वास ठेवता येईल. त्यांच्या आवडीच्या व्यवसायात राहण्याच्या त्यांच्या इच्छेला मी आव्हान देणार नाही. त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले पाहिजे. पण खोटे बोलणे किंवा निवडक प्रश्नचिन्ह हे माहिती देणाऱ्यांसाठी कायदेशीर संरक्षण असू शकते, परंतु या प्रश्नचिन्हांसह शंकास्पद विश्वासाची बीजे पेरली जातात”.
आणखी वाचा – Tharla Tar Mag : सायली देणार का अर्जुनवरील प्रेमाची कबुली, गैरसमजामुळे सुरु आहे गोंधळ, नक्की काय घडणार?
त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांनी अशा अनेक असत्यापित लेखांवर आपली निराशा व्यक्त केली आहे. बिग बी म्हणाले, “तुम्हाला जे पाहिजे ते लिहू शकता, परंतु जेव्हा तुम्ही त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करता तेव्हा तुम्ही फक्त असे म्हणत नाही की जे लिहिले आहे ते संशयास्पद असू शकते पण तुम्ही वाचकांना आश्वस्त करु इच्छित आहात त्यांना पुढे नेण्यासाठी, जेणेकरुन तुम्हाला त्याचा फायदा होत राहील. बच्चन यांनी येथे प्रश्नचिन्ह वापरुन अशा लोकांकडे बोट दाखवले आहे जे सत्य जाणून न घेता किंवा त्यांची पडताळणी न करता गोष्टी पसरवतात”.
ते म्हणाले, “जगाला असत्य किंवा संशयास्पद असत्याने भरुन टाका आणि मगच तुमचे काम पूर्ण झाले, त्याचा संबंधित व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर कितीही परिणाम झाला हे पाहाल तेव्हा सर्व हाताबाहेर गेलेलं असेल. तुमच्या विवेकबुद्धीने, जर तुमच्याकडे कधी असत्य असेल तर. ते दाबले गेले आहे का? त्यावर मी प्रश्नचिन्ह उभे केले आहे, हे पडताळा”.