Dhanush Nayanthara Ignore Each Other : साऊथ अभिनेत्री नयनतारा सध्या एका विशेष वादामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल’ या माहितीपटावरुन धनुष व नयनतारा यांच्यात सध्या वाद सुरु आहेत. धनुषच्या या कमेंटनंतर नयनताराने त्यांच्यावर टीका करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या वादात नयनतारा व धनुषने नुकतीच एका लग्नाला हजेरी लावली असल्याचं समोर आलं. मात्र यावेळी दोघांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केले. चित्रपट निर्माता आकाश भास्करन यांच्या लग्नात धनुष व नयनतारा उपस्थित होते. यामध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता.
या लग्नात ते एकमेकांसमोर येतील अशी कल्पना दोघांनीही केली नसेल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये धनुष व नयनतारा लग्नाच्या मंडपात बसलेले आहेत. व्हिडीओमध्ये धनुष व नयनतारा एकमेकांची नजर टाळत होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही आणि तोंड फिरवून दोघेही बसून राहिले. धनुष व नयनतारा समोरच्या रांगेत बसले होते. धनुषची नजर समोरच्या स्टेजवर असताना नयनतारा एका पाहुण्याशी बोलताना दिसली. पण ते ना एकमेकांशी बोलले ना एकमेकांना पाहिले.
वास्तविक, नयनताराने धनुषकडे तिच्या ‘ननम राउडी धन’ या चित्रपटातील गाणी व दृश्ये तिच्या ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल’ या माहितीपटासाठी वापरण्याची परवानगी मागितली होती. या चित्रपटात नयनताराही होती. मात्र धनुषने नकार दिला. पण नयनताराच्या डॉक्युमेंटरीमध्ये धनुषच्या चित्रपटातील तीन सेकंदांचे व्हिज्युअल वापरले गेले. धनुषने नयनतारावर चोरीचा आरोप करत तिला १० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
धनुषने नोटीस पाठवताच नयनतारा संतापली आणि तिने सोशल मीडियावर एक खुले पत्र लिहून धनुषवर टीका केली. नयनताराने पत्रात लिहिले होते की, धनुष त्याच्या वडील आणि भावामुळे कलाकार झाला, तर तिचा स्वतःचा कोणी गॉडफादर नाही. नयनताराने असेही लिहिले की, तिच्या संघर्षामुळेच ती चित्रपटसृष्टीत उभी आहे आणि यशस्वी आहे.