Ankita Walavalkar and Dhananjay Powar :’बिग बॉस मराठी’ सीझन ५ या पर्वाची सर्वत्र विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने अक्षरशः धुमाकूळ घातला. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवरही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने नाव कोरलं. तर पहिल्या पाच क्रमाकांत धनंजय पोवार व अंकिता वालावलकर यांनी बाजी मारली. अंकिता व डीपी यांचा खास बॉण्ड ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळाला. इतकंच नाही तर घराबाहेर आल्यानंतरही त्यांच्यातील हे नातं आणखी घट्ट झालेलं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात असताना डीपी अंकिताची विशेष काळजी घेताना दिसला. त्यांचं हे नातं पाहून सगळीकडून या जोडीला भरभरुन पाठिंबा मिळालेला पाहायला मिळाला. सोशल मीडियावर दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात आणि एकमेकांसाठी नेहमीच काही ना काही शेअर करत असतात.
अशातच डीपीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये डीपीच्या घराची झलक पाहायला मिळतेय. घर दाखवत तो ‘बिग बॉस’च्या घराच्या आठवणीत रमला आहे. आणि यावेळी डीपी व त्याची बायको कल्याणीही ‘आ चल के तुझे’ हे गाणं गुणगुणताना दिसत आहेत. डीपीने हा व्हिडीओ शेअर करत अंकिता वालावलकर आणि तिचा होणार नवरा कुणाल भगतला टॅग केलं आहे. इतकंच नाही तर “एकदम ‘बिग बॉस’मधील आठवण आली”, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.
आणखी वाचा – भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीची गौतम बुद्धांच्या प्रवासाशी तुलना, म्हणाली, “माझ्या आध्यात्मिक मार्गावर…”
हा व्हिडीओ पाहून अंकिताने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “‘बिग बॉस’ मला कधी आवडलं नव्हतं. कधी बघितलं पण नव्हतं. तिथे जाऊन आपली भेट झाली आणि मला घरातलं माझं कोणीतरी हक्काचं भांडायला मिळालं जिथे मी रुसू शकते, ओरडू शकते. तुम्ही होता म्हणुन मी होते. हे गाणं कुणाल माझ्यासाठी म्हणतो कारण त्याला वाटतं आता बस्स झालं तुला मी एवढं खूश ठेवेन की तू कधी रडली नाही पाहिजेस. फक्त प्रेम. तेच गाणं मी गुणगुणत संपूर्ण सीझन घालवला, हा विचार करुन की बाहेर छान आयुष्य आहे आणि सगळं नीट होईल. त्यात तुम्ही माझी घेतलेली काळजी जी बाहेर दाखवली गेलीच नाही. ती मी आणि कुणाल आणि माझं संपूर्ण कुटुंब कधीही विसरणार नाही. आयुष्यभर कायम बरोबर राहा”.
अंकिताच्या या कमेंटनंतर डीपीने कमेंट करत “तुझी साथ आणि आणि नाते अविस्मरणीय आहे. मी तुलाच नव्हे तर तुझ्या कुटुंबालाही माझं कुटुंब मानतो”, असं म्हटलं आहे. अंकिता व डीपी बरेचदा एकमेकांना भेटत असतात. भाऊबीज निमित्त अंकिताने कोल्हापुरात येत डीपीचं घर गाठलं. इतकंच नाही तर यावेळी ती येताना खास डीपीसाठी कोकणातून मासेही घेऊन आली होती.