Malaika Arora Relationship : मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली आहे. अर्जुन कपूरबरोबरच्या नात्यामुळे ती अधिक चर्चेत असायची. यानंतर आता मलायकाचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. फॅशन स्टायलिस्ट राहुल विजयबरोबर डेटिंग करत असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या आहेत. नुकतीच अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअप झालेली ही अभिनेत्री गेल्या आठवड्यात फॅशन स्टायलिस्टसह डिनरसाठी एकत्र स्पॉट झाली आणि शनिवारी रात्री ती पुन्हा एकदा त्याच्याबरोबरच एपी ढिल्लॉन कॉन्सर्टमध्ये दिसली होती. या कॉन्सर्टदरम्यान ती केवळ धिल्लॉनबरोबर स्टेजवर सामील झाली नाही, तर कॉन्सर्टनंतर राहुलबरोबरचा तिचा सेल्फी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पुन्हा पोस्ट केला, ज्यामध्ये ती आणि राहुल एकत्र पोज देताना दिसले. मलायकाने ‘तुझ्यासोबत’ गाण्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. राहुलने हा फोटो आधी शेअर केला होता. स्टायलिस्टने कॉन्सर्टमधील मालयकाबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. तिने पोस्टला कॅप्शन दिले, ‘थांबा, ही मलायका कॉन्सर्ट होती का?’

मलायका अरोरा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना उत्तेजित करत आहे. ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याची पुष्टी केल्यापासून मलायका अरोरा सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत आहे. बॉलिवूड स्टारने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, “प्रत्येक सकारात्मक विचार ही एक मूक प्रार्थना आहे जी तुमचे जीवन बदलेल. शुभ सकाळ, तुमचा दिवस चांगला जावो”.
आणखी वाचा – तुझ्या रंगी सांज रंगली! नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाच्या लग्नाचे Unseen Photo व्हायरल, शुभेच्छांचा वर्षाव
विभक्त झाल्यानंतर हा मॅसेज अर्जुन कपूरसाठी आहे की काय असा अंदाज चाहते लावत आहेत कारण यादरम्यान मलायका खूप काही सांगत आहे. अभिनेता अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाने तिच्या सध्याच्या आयुष्याकडे निर्देश करणारी एक मजेदार पोस्ट देखील शेअर केली आहे. पोस्टमध्ये ‘माझी स्थिती सध्या: रिलेशनशिपमध्ये किंवा सिंगल’ असे लिहिले होते. अर्जुन कपूरने आधीच सांगितले होते की तो पूर्णपणे सिंगल आहे आणि कोणाला डेट करत नाही.