Aishwarya Narkar Birthday : मराठी मालिकाविश्वात नेहमीच चर्चेत असणाऱ्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट व वेबसीरिजमधून महत्त्वपूर्ण कामगिरी करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनेत्रीने त्यांच्या अभिनय व सौंदर्याने ९० चं दशक गाजवलं. त्या काळातील त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. इतकंच नव्हे तर आजही त्या तितक्याच सुंदर दिसत असून प्रेक्षक त्यांच्या सौंदर्यावर भुळलेले असतात. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईला लाजवणारा आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत.
सध्या ऐश्वर्या या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्या या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या बर्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच ऐश्वर्या यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाची झलक पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वाढदिवसानंतर झालेलं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या टीमने ऐश्वर्या यांचा अगदी दणक्यात वाढदिवस साजरा केला. खास भेटवस्तू, केक, पुष्पगुच्छ देत त्यांचा वाढदिवस साजरा झालेला पाहायला मिळाला. शिवाय व्हिडीओमध्ये घरी साजरा केलेल्या वाढदिवसाची झलकही पाहायला मिळतेय. यावेळी त्यांचे पती अविनाश नारकर बायकोला केक भरवताना दिसत आहेत.
ऐश्वर्या यांनी हा व्हिडीओ शेअर करत साऱ्यांचे आभार मानले आहेत. “सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही मला विशेष प्रिय आहात. सोनेरी क्षण निर्माण करण्यात मला मदत केली. ज्या आठवणी मी कायम जपत राहीन. तुम्ही सर्व महत्त्वाचे आहात. विशेष विशेष धन्यवाद”, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.