Shalva Kinjawadekar And Shreya Daflapurkar Wedding : सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका आशु उर्फ शाल्व किंजवडेकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. शाल्व किंजवडेकरच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. शाल्वने फॅशन डिझाइनर श्रेया डफळापूरकरसह लगीनगाठ बांधली आहे. नुकतेच त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. शाल्व व श्रेया दोघेही लग्नात खूप सुंदर दिसत होते. शाल्व व श्रेया यांनी त्यांच्या लग्नासाठी खास लाल रंगाचा पोषाख निवडला होता. सिद्धार्थने या नवविवाहित जोडप्याबरोबरचा एक सेल्फी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. सिद्धार्थ चांदेकरने त्यांच्या लग्नाला हजेरी लावली आहे.
या लग्नातील पहिल्या फोटोपाठोपाठ शाल्व व श्रेया यांचा मंडपातील एक सुंदर असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शाल्व त्याची पत्नी श्रेयाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. यावेळी तिचे डोळे भरुन आलेले दिसले. शाल्वच्या बायकोच्या मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी शाल्वने बायकोला घातलेल्या मंगळसूत्रात कमीत कमी सोन्याचा वापर केलेला असून त्यात जास्तीत जास्त काळे मणी असलेले पाहायला मिळत आहेत. शाल्वच्या बायकोच्या अत्यंत साध्या व सिंपल मंगळसूत्राच्या डिझाईनची सर्वत्र चर्चा होत आहे.
आणखी वाचा – ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरचं थाटामाटात लग्न, दोघांच्या लाल रंगाच्या आऊटफिटने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर
शाल्व व श्रेया यांनी लग्नगाठ बांधत सात फेरे घेतले आहेत. लग्नासाठीच्या त्यांच्या खास लूकने लक्ष वेधलं आहे. यावेळी श्रेयाने लाल रंगाची साडी आणि पारंपरिक दागिने परिधान केले आहेत. तर शाल्वने लग्नासाठी लाल रंगाची शेरवानी परिधान केली आहे. मोत्यांच्या मुंडावळ्या बांधलेल्या या नववधूवराचा लूक पूर्ण केला. तर लग्नानंतर हे जोडपं पारंपरिक अंदाजात दिसलं. श्रेयाने यावेळी हिरव्या रंगाची साडी नेसलेली दिसली तर शाल्वने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा व धोतर परिधान केलं आहे.
आणखी वाचा – Video : ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरने बायकोला मंगळसूत्र घालताच अश्रू अनावर, मंडपातील सगळ्यात गोड क्षण समोर
शाल्व व श्रेया यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलेलं पाहायला मिळतंय. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत शाल्व व श्रेया यांनी लग्नसमारंभ उरकला आहे. श्रेया आणि शाल्व दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अनेक रोमँटिक फोटोही शेअर केलेत. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी साखरपुडा केला होता. काही दिवसांपासून शाल्वच्या घरी लगीनघाई सुरु झाली असल्याचं पाहायला मिळालं.