Kiran Gaikwad Wedding : मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हा लोकप्रिय चेहरा म्हणजे ‘देवमाणूस २’ फेम अभिनेता किरण गायकवाड काही वेळातच लग्नबंधनात अडकणार आहे. किरण अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसह लगीनगाठ बांधणार आहे. अशातच बोहोल्यावर चढण्याआधी नवरदेवाचा मंडपाकडे जातानाचा एक सुंदर असा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये नवरा मुलगा लग्नासाठीच्या स्पेशल लूकमध्ये पाहायला मिळतोय. बरेच दिवसांपासून किरण व वैष्णवी यांच्या लग्नाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. दोघांच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली असून आता अखेर तो क्षण आला आहे. काही वेळातच किरण व वैष्णवी विवाहबंधनात अडकणार आहेत.
किरण व वैष्णवी यांच्या लग्नासाठी सिनेविश्वातील कलाकार मंडळी पोहोचली आहेत. त्यांचा शाही विवाहसोहळ्याचे आयोजन कोकणात सावंतवाडी पॅलेस येथे करण्यात आले आहे. त्यामुळे ही वर्हाडी मंडळी थेट कोकणात पोहोचली आहेत. अशातच लग्नासाठी सज्ज असलेल्या नवऱ्या मुलाच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तो घोड्यावर बसून स्वार झालेला पाहायला मिळत आहे. यावेळी किरणचा लग्नासाठीचा लूक पाहायला मिळतोय. किरणने शुभ्र पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि फेटा परिधान करत खास लूक केला आहे.
आणखी वाचा – Video : ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरने बायकोला मंगळसूत्र घालताच अश्रू अनावर, मंडपातील सगळ्यात गोड क्षण समोर
यावेळी किरणचे मित्र-मंडळी व नातेवाईक वरातीत तुफान धमाल करताना दिसत आहेत. बेंजोवर ठेका धरत हे वर्हाड मंडपाच्या दिशेने जाताना दिसत आहे. काल किरण व वैष्णवी यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी अभिनेत्याने गुडघ्यावर बसून अभिनेत्रीला अंगठी घातल्याचे पाहायला मिळाले. थाटामाटात साखरपुडा पार पडल्यावर दोघांच्या हळदी समारंभाचीही धमाल पाहायला मिळाली. हळदी समारंभातही किरणसह वैष्णवीने ठेका धरला.
आणखी वाचा – ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरचं थाटामाटात लग्न, दोघांच्या लाल रंगाच्या आऊटफिटने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर
इतकंच नव्हे तर त्यांचा संगीत सोहळाही थाटामाटात पार पडला. यावेळी किरण-वैष्णवी यांनी काही रोमॅंटिक गाण्यांवर हटके डान्स केला. किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांचा लग्नसोहळा आज म्हणजेच १४ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार व त्यांच्या मित्रमंडळींनी किरण-वैष्णवीच्या लग्नाला उपस्थित आहेत.