Kiran Gaikwad Vaishnavi Kalyankar Wedding : अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर व अभिनेता किरण गायकवाड यांचा नुकताच शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. दोघांच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर आला असून ही जोडी विवाहबंधनात अडकली असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठमोळ्या व पारंपरिक अंदाजात दोघांनी त्यांचा विवाहसोहळा उरकला आहे. दरम्यान, दोघांचा त्यांचा लग्नसोहळ्यातील पहिला फोटो समोर आला आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघेही नववधूवराच्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. अखेर किरण व वैष्णवी यांनी सात फेरे घेत लगीनगाठ बांधली असल्याचं समोर आलं आहे.
नववधूवराच्या लूकमध्ये किरण व वैष्णवी खूपच सुंदर दिसत आहेत. यावेळी वैष्णवीने पारंपरिक नऊवारी साडी नेसली आहे तर किरण शुभ्र पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच उठून दिसत आहे. बाशिंग बांधून ही नववधूवराची जोडी खूप सुंदर दिसत आहे. एकमेकांना वरमाला घातल्यानंतरचा त्यांचा हा एकत्र फोटो खूपच सुंदर दिसला. किरण व वैष्णवीच्या चेहऱ्यावर आनंदही पाहायला मिळला. वरमाला घालताना दोघेही खूप खुश असलेले दिसले.
आणखी वाचा – ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरचं थाटामाटात लग्न, दोघांच्या लाल रंगाच्या आऊटफिटने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर

अखेर प्रेक्षकांची ही लाडकी जोडी लग्नबंधनात अडकत त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात किरण व वैष्णवी यांनी लग्न केले. दोघांनी त्यांच्या लग्नाचा घाट हा कोकणात घातला आहे. कोकणात सावंतवाडी पॅलेस येथे त्यांच्या विवाह समारंभाचे आयोजन केले आहे. किरण-वैष्णवीच्या डेस्टिनेशन वेडिंगला सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित आहेत. त्यांच्या हळदी समारंभातही या कलाकार मंडळींनी तुफान राडे करत जबरदस्त डान्स केलेला पाहायला मिळाला.
किरण व वैष्णवी यांनी थेट रोमँटिक फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली. बऱ्याच वर्षांपासून किरण व वैष्णवी एकमेकांना डेट करत होते. दोघांची भेट ही ‘देवमाणूस २’ या मालिकेदरम्यान झाली. या मालिकेत किरण व वैष्णवी यांनी एकत्र काम केले होते. मैत्रीपासून सुरु झालेल्या नात्याचं प्रेमात रुपांतर झालं, आणि त्यानंतर अखेर आज दोघांनी लगीनगाठ बांधली. दोघांनीही सहजीवनाच्या प्रवासाचं एक पाऊल टाकलं आहे.