Shalva Kinjawadekar And Shreya Daflapurkar Wedding : मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच मालिकाविश्वातील आणखी एक कलाकार लग्नबंधनात अडकला असल्याचं समोर आलं आहे. शिवा फेम अभिनेता शाल्व किंजवडेकरचा नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला आहे. शाल्वने फॅशन डिझाइनर श्रेया डफळापूरकरसह लगीनगाठ बांधली आहे. शाल्व व श्रेयाच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने त्यांच्या लग्नातील पहिला फोटो शेअर केला आहे. सिद्धार्थने सेल्फी घेत काढलेल्या फोटोमध्ये नववधूवराचा सुंदर असा लूक पाहायला मिळत आहे. दोघांचाही हा लूक खूप खास असल्याचं पाहायला मिळतंय.
शाल्व व श्रेया यांनी लग्नगाठ बांधत सात फेरे घेतले आहेत. लग्नासाठीच्या त्यांच्या खास लूकने लक्ष वेधलं आहे. यावेळी श्रेयाने लाल रंगाची साडी आणि पारंपरिक दागिने परिधान केले आहेत. तर शाल्वने लग्नासाठी लाल रंगाची शेरवानी परिधान केली आहे. मोत्यांच्या मुंडावळ्या बांधलेल्या या नववधूवराचा खास लूक अधिक लक्षवेधी ठरत आहे. शाल्व व श्रेया यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलेलं पाहायला मिळतंय. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत शाल्व व श्रेया यांनी लग्नसमारंभ उरकला आहे.
आणखी वाचा – किरण गायकवाडचा हटके संगीत सोहळा, होणाऱ्या बायकोसह खेळला गेम, एकमेकांची पोलखोल केली अन्…
लग्नाच्या वेळीही श्रेयाला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. त्यांचा एक लग्नातील सुंदर असा व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. काही दिवसांपासून शाल्वच्या घरी लगीनघाई सुरु झाली असल्याचं पाहायला मिळालं. शाल्व व श्रेया यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. दोघेही लग्नाआधीच्या त्यांच्या या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटताना दिसले. त्यानंतर आता त्यांच्या लग्नातील फोटो व व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं.
आणखी वाचा – Video : अमिताभ बच्चन यांच्या नातवाशी रेखा यांची गळाभेट, गालावरुन हात फिरवत विचारपूस, व्हिडीओ व्हायरल
शाल्व सध्या ‘शिवा’ या मालिकेत आशु हे पात्र साकारताना दिसत आहे. या आशु या पात्राला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळत आहे. याआधी तो ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत झळकला होता. ‘शिवा’ मालिकेतील आशु या पात्रामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. तर शाल्वची होणारी बायको श्रेया डफळापूरकर ही फॅशन डिझाइनर आहे.