प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर ही काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या दुस-या लग्नातही काही अडचणी आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी निखिल पटेलबरोबर दुसरे लग्न केले होते आणि तिच्या या दुसऱ्या लग्नातही काही समस्या असल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्रीने गेल्या वर्षी व्यावसायिक निखिल पटेलबरोबर दुसरे लग्न केले होते. दरम्यान, दलजीतने सोशल मीडियाद्वारे तिच्या ब्राइडल लूकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दलजीतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वधूच्या पोशाखात दिसत आहे. मात्र तिच्या चेहऱ्यावर निराशा आणि डोळ्यात वेदना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री नवविवाहित वधूप्रमाणे दिसत आहे. तिने लाल रंगाच्या ड्रेस परिधान केला असून तिने कपाळावर सिंदूरही लावल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दलजीतने डोळ्यांत काजल, हातात बांगड्या, कानात मोठे झुमके आणि गळ्यात भरजरी असा हार परिधान केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून यामुळे दलजीतच्या लग्नाविषयीच्या अनेक चर्चा रंगत आहेत.
काही दिवसांपूर्वी दलजीतने याच लुकमधील एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओखालील कॅप्शनमध्ये दलजीतने असं म्हटलं होतं की, “ती तिच्या मुलांसाठी मौन बाळगून आहे. यावेळी तिला खाली पडू न देण्यासाठी तिचे कुटुंबीयही तिला घट्ट धरून ठेवतात. ती वाट पाहत आहे”. दलजीत व निखिलच्या घटस्फोटाची बातमी जेव्हा प्रसारित झाली, तेव्हा अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या पतीचे आडनाव इन्स्टाग्रामवरून हटवले होते. यानंतर लोक असा अंदाज लावू लागले की, दलजीत वाईट काळातून जात आहे आणि तिचे दुसरे लग्नही लवकरच तुटणार आहे. मात्र, यावर अभिनेत्रीने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
दलजीत व निखिलच्या घटस्फोटाची बातमी जेव्हा प्रसारित झाली, तेव्हा अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या पतीचे आडनाव इन्स्टाग्रामवरून हटवले होते. यानंतर लोक असा अंदाज लावू लागले की, दलजीत वाईट काळातून जात आहे आणि तिचे दुसरे लग्नही लवकरच तुटणार आहे. मात्र, यावर अभिनेत्रीने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. दरम्यान, १८ मार्च २०२३ रोजी दलजीत व निखिल यांचे लग्न पार पडले होते. लग्नानंतर अभिनेत्री आपल्या पती व मुलासह केनियामध्ये राहत होती. मात्र जानेवारी महिन्यात ही अभिनेत्री भारतात परतली, त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाबद्दलच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या