घराच्या प्रत्येक किचनमध्ये आपली आई कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात, फ्रीजकव्हर खाली किंवा गादीच्या खाली प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवत असते. कुठेतरी वापरता येतील, कधीतरी उपयोगी पडतील आशा हिशोबाने या पिशव्यांची साठवण केली जाते. पण आता प्लॅस्टिकचा वापर कमी झालेला दिसून येत आहे. पर्यावरणाचे संरक्षण कमी व्हावे यासाठीदेखील प्लॅस्टिकच्या अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी कापडाच्या पिशव्या मिळण्यास सुरुवात झाली. मात्र या पिशव्या महाग मिळत असल्याचे कापडी पिशवीची मागणी कमी झाली. त्यामुळे लोकांनी अशा पिशव्या घेणं लोक टाळू लागले. अशातच आता यावर उपाय म्हणून एक नवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी समोर घेऊन आलो आहोत. (cotton fabric bags)
प्लॅस्टिक पिशव्यांवर उपाय म्हणून सर्वत्र कापडी पिशव्या वापरण्यात येऊ लागल्या. पण या सगळ्यांनाच परवडतील आशा पिशव्या सगळ्यांनाच घेता याव्यात यासाठी एका मायलेकीच्या जोडीने खूप स्वस्तात आशा पिशव्या खूप कमी दरात उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच या माध्यमातून त्यांनी स्वतःचा एक छोटासा व्यवसायदेखील सुरु केला आहे. श्रीरूप व पौर्णिमा या मायलेकीच्या जोडीने कापडाच्या पिशव्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथील एका ठिकाणी या दोघी पिशव्यांचा स्टॉल लावलेला असतो.
त्यांच्या स्टॉलवर लहान कापडी पिशव्यांपासून ते अगदी मोठ्या वापरता येतील आशा पिशव्या उपलब्ध असलेल्या दिसून येतात. अगदी २० रुपयांपासून या पिशव्या मिळतात. या पिशव्यांची क्वालिटी उत्तम असून बंददेखील एकदम मजबूत असे असतात. या पिशव्या किरकोळ खरेदी करता येतेच. याबरोबर या पिशव्या होलसेल दरातदेखील उपलब्ध आहेत. पिशव्यांचे अनेक पॅटर्नदेखील उपलब्ध आहेत.
या ठिकाणी पिशव्यांचे युनिक कलेक्शन पाहायला मिळते. तसेच वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनही बघायला मिळते. या पिशव्या जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील दादर येथील ओव्हन फ्रेश रेस्टॉरंटच्या बाजूला सोमवार ते शनिवार संध्याकाळी ५ ते ९ वाजताच्या दरम्यान खरेदी करता येतील. त्यामुळे लवकरच या ठिकाणी भेट द्या आणि त्वरित खरेदी करा.