‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या चारुहास आणि चारुलता (भुवनेश्वरी) यांच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात अक्षराला चारुलता भुवनेश्वरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर ती हे घरातील सर्वांना सांगते. पण तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर घरातील सर्व तिला वेडी ठरवतात. यामुळे भुवनेश्वरी तिला प्लॅन करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करते. चारुलता भुवनेश्वरी असल्याबद्दल कुणालाच काहीही कल्पना नाही आणि तिच्या याच जाळ्यात सूर्यवंशी कुटुंबीय अडकले आहेत. एकीकडे अक्षरा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे, तर दुसरीकडे भुवनेश्वरी तिची चाल खेळणार आहे. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Updates)
सध्या अक्षराची रवानगी रुग्णालयात करण्यात आलेली आहे. इथून बाहेर पडण्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करत असते. पण, काही केल्या अक्षराला ते शक्य होत नाही. कारण, भुवनेश्वरीने तिला अडकवून चारुहासशी लग्न करण्याचा डाव आखलेला असतो. तिला त्रास देण्यासाठी रुग्णालयात बजरंग येतो. पण, नर्स, डॉक्टर या सगळ्यांना भुवनेश्वरीने आधीच पैसे दिलेले असतात. अधिपतीला हे सगळेजण इथे कोणीच आलेलं नाही असं सांगतात. अशातच आता अक्षरा भुवनेश्वरीचा लग्न लावण्याचा डाव उधळून लावणार आहे.
झी मराठीच्या सोशल मीडियाद्वारे या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे आणि या नवीन प्रोमोमध्ये अक्षरा वेश बदलून हॉस्पिटलमधून पळ काढणार आहे. कालच्या भागात चंचलाकडून अक्षराला भुवनेश्वरी तिच्या गैरहजेरीत लग्न लावणार असल्याचे कळलं आहे. त्यामुळे आता अक्षरा हे लग्न थांबवण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे हे लग्न थांबवण्यासाठी ती हॉस्पिटलमधून पळणार आहे. या प्रोमोमध्ये अक्षराला तपासण्यासाठी नर्स येते. या नर्सला बेशुद्ध करुन ती तीचे कपडे घालते आणि नर्सच्या वेशात पळ काढते.
एकीकडे अक्षरा हॉस्पिटलमधून पळ काढते. तर दुसरीकडे चारुलता (भुवनेश्वरी) व तिच्या लग्नाचा घाट घालत आहे. यावेळी ती आता मी सगळ्या विधी पूर्ण करणार असल्याचे सासूला सांगते. त्यामुळे आता भुवनेश्वरी अक्षराच्या गैरहजेरीत स्वत:चं लग्न लावणार का? की अक्षरा हॉस्पिटलमधून येत हे लग्न थांबवणार? किंवा भुवनेश्वरी सुनेला खोटं सिद्ध करण्यात पुन्हा एकदा यशस्वी होणार? हे पाहणं आगामी भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.