Abhishek Gaonkar Wedding : सध्या सिनेविश्वात अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अशातच मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय चेहरा लग्नबंधनात अडकला असल्याचं समोर आलं आहे. हा अभिनेता म्हणजे ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गांवकर. अभिषेक गांवकरच्या लग्नाची बरेच दिवासांपासून चर्चा सुरु होती. अखेर आज अभिषेक व सोनाली ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. दोघांच्या लग्नसोहळ्यातील खास लूक समोर आलेला पाहायला मिळतोय. अभिषेक व सोनालीच्या लग्नापुर्वीच्या विधींचे अनेक व्हिडीओ, फोटो तुफान व्हायरल होताना पाहायला मिळाले. अखेर आता ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे.
सोनाली व अभिषेक यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. दोघांनी कोकणात मालवण येथे त्यांचा लग्नसमारंभ उरकला. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, आणि मित्रपरिवाराच्या उपस्थिती हा सोहळा संपन्न झाला. डेस्टिनेशन वेडिंग करत ही जोडी एकत्र आली. लग्नासाठी दोघांनी केलेल्या पारंपरिक लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधलं. लग्नातील समोर आलेल्या फोटोमध्ये अभिषेक व सोनाली यांचा पारंपरिक लूक पाहायला मिळतोय. पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये नवऱ्या मुलीचं सौंदर्य खुललं तर त्यावर तिने गुलाबी रंगाचा शेला घेतला होता. तर सोनालीच्या शेलाला मॅचिंग असा गुलाबी रंगाचा कुर्ता अभिषेकने परिधान केला तर पिवळ्या रंगाचं धोतर त्याने घातलं.
आणखी वाचा – Video : “मला शिक्षण घ्यायला जमलं नाही पण…”, शाळकरी मुलांसमोर सूरज चव्हाणचं भाषण, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव
हिरवा चुडा, भरपूर दागिने परिधान करत सोनाली खूपच सुंदर दिसत होती. दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळीही उपस्थित आहेत. सुरुची अडारकर, पियुष रानडे, भक्ती देसाई, अशोक शिंदे ही कलाकार मंडळी सोनाली व अभिषेकच्या लग्नाला पोहोचली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिषेकने नव्या प्रवासाला सुरुवात करत साखरपुडा केला होता. त्याची पत्नी सोनाली गुरव ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व रील स्टार म्हणून घराघरांत लोकप्रिय आहे.
अभिषेकची बायको सोनाली गुरव ही सोशल मीडियावर विविध मजेशीर रील व्हिडीओ बनवत असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिच्या रीलला मिलियनच्या घरात व्ह्यूज असतात. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र होते. आता नुकतेच अभिषेक व सोनाली लग्नबंधनात अडकले आहेत.