हिंदी विनोदी विश्वातील सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे भारती सिंह. विनोदाची अचूक जाण असणाऱ्या भारतीने तिने कौशल्याच्या जोरावर कलाविश्वात लाफ्टर क्वीन अशी एक वेगळी ओळख मिळवली आहे. २०१७ मध्ये भारतीने हर्ष लिंबाचियासह विवाह केला. यानंतर ३ एप्रिल २०२२ रोजी त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. भारती व हर्षने आपल्या लाडक्या लेकाचं नाव ‘लक्ष’ असं ठेवलं आहे. हर्ष-भारती त्यांच्या लेकाला लाडाने गोला असंही म्हणतात.
अशातच त्यांच्या लाडक्या लेकाचा आज शाळेचा पहिला दिवस असून भारतीने तिच्या व्लॉगमधून लेकाच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओत ती काही ठिकाणी भावुक झाली असल्याचेही पाहायला मिळत आहे. यावेळी ती भावुक होत असं म्हणते की, “मला यांची चिंता लागून राहिली आहे. माझ्यापेक्षा रुपा दीदीला (भारतीची मदतनीस) त्याची काळजी वाटत आहे. तो शाळेत एकटा बसणार कसा? एकटा खाणार कसा?. पण मला वाटतं प्रत्येक आईबाबत हे असं होतं. माहीत नाही पण मनात आपल्या मुलाविषयी कसंतरी होतं.”
यानंतर पुढे ते भारती व हर्ष लेकाच्या शाळा सुटण्याची वाट बघत असतात. त्यानंतर त्याची शाळा सुटताच ते त्याला घेऊन घरी येताना खूप मजा मस्ती करतात. यावेळी त्यांना वाटेत अमिताभ बच्चन यांचे घरही दिसते. तसेच ते दोघे त्यांच्या लाडक्या लेकाला घेऊन शॉपिंगलाही जातात. तिथे त्याच्यासाठी खास खेळणी विकत घेतात.
आणखी वाचा – मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल, छातीमध्ये दुखू लागले अन्…; कोलकातामध्ये उपचार सुरू
दरम्यान, भारतीने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. भारती व हर्षची पडद्यावरील केमिस्ट्री चाहत्यांना कायमच आवडते. त्याचबरोबर व्लॉगच्या माध्यमातूनही ते चाहत्यांच्या चांगलेच संपर्कात राहतात आणि त्यांच्या या व्लॉगला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो.