सध्या सर्वत्र मुंबईमध्ये होत असलेल्या ‘कोल्डप्ले’ कॉन्सर्टची चर्चा सुरु आहे. हॉलिवूड पॉपसिंगर क्रिस मार्टिन कॉन्सर्टकरिता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. या कॉन्सर्टची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. मुंबईमध्ये कॉन्सर्ट आयोजित केला जाणार हे समजताच चाहत्यांची तिकीट काढण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती. इच्छा असूननही अनेकांना तिकीट मिळालं नाही. तसेच त्यानंतर हा कॉन्सर्ट रद्द होणार असल्याच्या चर्चादेखील सुरु झाल्या. मात्र या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचेही आयोजकांनी सांगितले. सध्या कोल्डप्ले बँड भारत दौरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये नुकताच हा कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टसाठी हजारो चाहत्यांनी हजेरी लावली होती. (chris martin at mumbai concert)
ख्रिस हजारो चाहत्यांना बघून खूपच खुश झाला. त्याने मोठ्या संख्येने हजर राहिल्याने चाहत्यांचे आभारदेखील मानले. त्याच्या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलेही बघायला मिळाले. यामध्ये ख्रिसचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तो श्रीरामाचा जय घोष करताना दिसत आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये श्रीरामाचा एकच जयघोष बघायला मिळाला. ख्रिसने चाहत्यांबरोबर संवाददेखील साधला आणि त्याचवेळी त्याने ‘जय श्रीराम’ असे म्हणाला. त्याच्यानंतर तिथे असलेल्या हजारो चाहत्यांनी त्याला साथ दिली आणि संपूर्ण स्टेडियम श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमले.
Coldplay's Chris Martin kicks off the concert by saying Jai Shree Ram#Coldplay #ChrisMartin pic.twitter.com/Jjzu0Chmnn
— Surajit (@surajit_ghosh2) January 18, 2025
कॉन्सर्टच्या एक दिवस आधी ख्रिस त्याची गर्लफ्रेंड डिकोटा जॉन्सनबरोबर मुंबईतील बाबूलनाथ मंदिरात गेला होता. यावेळी त्याने मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेतले. ख्रिस व डिकोटाचे मंदिरातील अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी डिकोटाचा भारतीय वेशभूषेतील लूक बघायला मिळाला. तिचा हा लूक बघून चाहत्यांना आश्चर्य वाटले होते. तसेच तिच्या या लूकला अनेकांनी पसंतीदेखील दर्शवली होती.
भारतामध्ये कोल्डप्ले बॅंडचा मोठा चाहतावर्ग आहे. भारतात १८ , १९ जानेवारी रोजी हे कॉन्सर्ट पार पडले आहेत. आता पुन्हा २१ जानेवारी रोजी होणाऱ्या कॉन्सर्टची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. दरम्यान नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टमध्ये बॉलिवूड गायिका जसलीन रॉयलनेदेखील ख्रिसबरोबर गाणं गायलं. त्यांचादेखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.