बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका म्हणून फराह खानचे नाव आवर्जून घेतले जाते. तिने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये काम करत आहे. तिने शिरीष कुंदर बरोबर लग्न केले असून तिने तीन मुलांची आईदेखील आहे. नुकतेच तिने एक मुलाखत दिली आहे ज्यामध्ये तिने आपल्या आयुष्यातील एक मजेदार किस्सा सांगितला आहे. हा किस्सा बॉलिवूडचा किंग शाहरुख खानशी निगडीत आहे. काय आहे हा किस्सा जाणून घेऊया. (farah khan on shahrukh khan)
फराहने तिच्या गरोदरपणावेळचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. जेव्हा तिची डिलिव्हरी होणार होती तेव्हा शाहरुख खान तिला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला होता. शाहरुखच्या येण्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. तसेच जेव्हा शिरीष व फराह बाळासाठी प्रयत्न करत होते तेव्हा ती शाहरुखसमोरही रडली असल्याचे सांगितले होते.
फराहने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तीन बाळांना जन्म दिला होता. याबरोबर तिने सांगितले की, “माझी जेव्हा डिलिव्हरी होत होती तेव्हा तिथे तब्बल ३५ लोक उपस्थित होते. हा अनुभव माझ्यासाठी खूप लक्षात राहण्यासारखा आहे”. तसेच पुढे ती म्हणाली की, “जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा मात्र खूप गोंधळ उडाला होता आणि रुग्ण म्हणजे मी सलाईन लाऊन त्याच्या समोर उभी होते”.
हा किस्सा सांगतानाच तिने आई होऊ न शकल्याचाही एक किस्सा शेअर केला. तिने सांगितले की, “एकदा आम्ही ओम शांती ओम’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. तेव्हा जेवताना मला माझ्या डॉक्टरचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की यावेळीही तू प्रेग्नट नाहीस. यादरम्यान मला शूटिंगसाठीही परत बोलावलं. मी तेव्हा आत गेले तेव्हा शाहरुखला काहीतरी गडबड असल्याचे समजले आणि मला तो त्याच्या व्हॅनमध्ये घेऊन गेला. मी त्याच्याजवळ बसून तब्बल एक तास रडत होते”.
फराहने डिसेंबर २००४ साली शिरीष कुंदरबरोबर लग्न केले. २००८ साली ‘विट्रो फर्टीलायजेशन’च्या माध्यमातून तीन मुलांना जन्म दिला. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘मै हू ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून काम सुरु केले. त्यानंतर ‘ओम शांती ओम’, ‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले.