सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये भापती सिंह दिसणार?, सतत होणाऱ्या चर्चांवर स्वतःच दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “समोरुन फोन…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 27, 2024 | 4:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bharti singh on kapil sharma show

कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये भापती सिंह दिसणार?, सतत होणाऱ्या चर्चांवर स्वतःच दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, "समोरुन फोन..."

लहान पडद्यावरील सगळ्यांना आवडता विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. २०१६ साली सुरु झालेल्या या कार्यक्रमाने सर्वांनाच खदखदून हसवले. पण काही कारणामुळे हा कार्यक्रम संथ झाला. तसेच या कार्यक्रमामध्ये दिसलेल्या सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशातच आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर व सुनील ग्रोव्हर दिसत आहेत. पण यामध्ये ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह या प्रोमोमध्ये दिसली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी चर्चा सुरु झाल्या. (bharti singh on kapil sharma show)

आतापर्यंत ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये भारती सर्वांचे मनोरंजन करताना दिसून आली होती. मात्र या पर्वामध्ये भारती दिसून न आल्याने चर्चा सुरु होत्या. अशातच आता भारतीने याबाबत खुलासा केला आहे.

आणखी वाचा – केतकी माटेगावकर नेमकं कोणाला डेट करते?, अभिनेत्रीच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारताच दिलं थेट उत्तर, म्हणाली, “माझ्या कुटुंबियांच्या…”

View this post on Instagram

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

भारतीने नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ बद्दल भाष्य केले आहे. तेव्हा ती म्हणाली की, “कपिलचा शो जॉइन करण्याचा सध्या माझा कोणताही विचार नाही. पण काही असेल तर मी निश्चित सहभागी होईन. सध्या मी इतर प्रोजेक्ट, पॉडकास्ट व ‘डान्स दिवाने’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण मला जर कॉल आला तर मी नक्की जाईन”. अनेक कामांमध्ये व्यस्त असल्याने या पर्वामध्ये ती काम करु शकणार नाही. पण जर तिला बोलावले तर ती जाण्यासाठी तयार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा – ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर राम तर कौशल्याच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री, ‘ॲनिमल’मध्ये साकारली होती अभिनेत्याच्या सासूची भूमिका

भारती याआधी कपिलच्या शोमध्ये काही पर्वात दिसून आली होती. भारतीने साकारलेली सर्व पात्र प्रेक्षकांनी पसंत केली आहेत. जरीही भारती या पर्वामध्ये कपिलबरोबर काम करत नसली तरीही त्या दोघांच्या मैत्रीच्या नात्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही.

कपिलचा नवीन शो ३० मार्चपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रिम होणार आहे. या पर्वातील पाहिल्या एपीसोडचे पाहुणे अभिनेते रणबीर कपूर व नितू कपूर असणार आहेत. तसेच यामध्ये पहिल्यांदाच आमिर खानदेखील असण्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

Tags: baharti singhkapil sharmaott showthe great indian kapil sharma show
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Lakshmi Narayanan Seshu Death

दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मी नारायणन शेषु यांचे निधन, ६०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमवावा लागला जीव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.