शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलांना जन्म दिल्यानंतर शाहरुख खान रुग्णालयामध्ये बघायला आला अन्…; फराह खानने सांगितला प्रेग्नंसीचा ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “हाताला सलाईन…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 27, 2024 | 6:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
farah khan on shahrukh khan

मुलांना जन्म दिल्यानंतर शाहरुख खान रुग्णालयामध्ये बघायला आला अन्...; फराह खानने सांगितला प्रेग्नंसीचा 'तो' प्रसंग, म्हणाली, "हाताला सलाईन..."

बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका म्हणून फराह खानचे नाव आवर्जून घेतले जाते. तिने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये काम करत आहे. तिने शिरीष कुंदर बरोबर लग्न केले असून तिने तीन मुलांची आईदेखील आहे. नुकतेच तिने एक मुलाखत दिली आहे ज्यामध्ये तिने आपल्या आयुष्यातील एक मजेदार किस्सा सांगितला आहे. हा किस्सा बॉलिवूडचा किंग शाहरुख खानशी निगडीत आहे. काय आहे हा किस्सा जाणून घेऊया. (farah khan on shahrukh khan)

फराहने तिच्या गरोदरपणावेळचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. जेव्हा तिची डिलिव्हरी होणार होती तेव्हा शाहरुख खान तिला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला होता. शाहरुखच्या येण्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. तसेच जेव्हा शिरीष व फराह बाळासाठी प्रयत्न करत होते तेव्हा ती शाहरुखसमोरही रडली असल्याचे सांगितले होते.

आणखी वाचा – कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये भापती सिंह दिसणार?, सतत होणाऱ्या चर्चांवर स्वतःच दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “समोरुन फोन…”

View this post on Instagram

A post shared by D'YAVOL X (@dyavol.x)

फराहने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तीन बाळांना जन्म दिला होता. याबरोबर तिने सांगितले की, “माझी जेव्हा डिलिव्हरी होत होती तेव्हा तिथे तब्बल ३५ लोक उपस्थित होते. हा अनुभव माझ्यासाठी खूप लक्षात राहण्यासारखा आहे”. तसेच पुढे ती म्हणाली की, “जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा मात्र खूप गोंधळ उडाला होता आणि रुग्ण म्हणजे मी सलाईन लाऊन त्याच्या समोर उभी होते”.

आणखी वाचा – “बहिणीची काळजी घे”, तितीक्षा तावडेच्या भावाने सिद्धार्थ बोडकेचा पिळला कान, अभिनेता उत्तर देत म्हणाला, “ओके ओके मी…”

हा किस्सा सांगतानाच तिने आई होऊ न शकल्याचाही एक किस्सा शेअर केला. तिने सांगितले की, “एकदा आम्ही ओम शांती ओम’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. तेव्हा जेवताना मला माझ्या डॉक्टरचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की यावेळीही तू प्रेग्नट नाहीस. यादरम्यान मला शूटिंगसाठीही परत बोलावलं. मी तेव्हा आत गेले तेव्हा शाहरुखला काहीतरी गडबड असल्याचे समजले आणि मला तो त्याच्या व्हॅनमध्ये घेऊन गेला. मी त्याच्याजवळ बसून तब्बल एक तास रडत होते”.

फराहने डिसेंबर २००४ साली शिरीष कुंदरबरोबर लग्न केले. २००८ साली ‘विट्रो फर्टीलायजेशन’च्या माध्यमातून तीन मुलांना जन्म दिला. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘मै हू ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून काम सुरु केले. त्यानंतर ‘ओम शांती ओम’, ‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले.   

Tags: baby bornbollywood actorfarah khanshahrukh khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Jennifer Mistry first reaction after winning the sexual harassment case against Asit Modi

'तारक मेहता…'च्या निर्मात्यांनी मालिकेतील रोशन सिंग सोडीचं केलेलं शारिरीक शोषण, खटला जिंकल्यानंतर अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "योग्य न्याय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.