शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Chhaava Movie Teaser : ‘छावा’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, विकी कौशलने जिंकलं प्रेक्षकांचं मन, काही मिनिटांतच हजारो व्ह्युज

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 19, 2024 | 11:34 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chhaava movie teaser Bollywood actor Vicky kaushal as chhatrapati sambhaji maharaj see the details

विकी कौशलच्या ‘छावा’ची सोशल मीडियावर हवा, अल्पवधीतच प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद

Chhaava Movie : विकी कौशल आणि बॉक्स ऑफिस किंवा ओटीटीवर गाजणारा चित्रपट असे समीकरण गेल्या काही वर्षात पाहायला मिळते आहे. अलीकडे विकीचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपटही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. यातील ‘तौबा तौबा’ गाण्याने तर सोशल मीडियासह सर्वत्र कहर केला. अशातच आता विकी कधीही न पाहिलेल्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘छावा’ या चित्रपटामध्ये विकी कौशल हा हरहुन्नरी अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटातील त्याची वेशभूषा समोर आली होती. तेव्हापासून सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. (Chhaava Movie Teaser)

विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना विकी कौशलने कॅप्शनमध्ये असं लिहिले आहे की, “अनबोल्ड, अतूट, अजिंक्य, साम्राज्याला आव्हान देण्याचे धैर्य”. सोशल मीडियावर हा ट्रेलर प्रदर्शित होताच अल्पावधीतच या टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. अनेक लाइक्स व कमेंट्सद्वारे प्रेक्षकांकडून या टीझरला प्रेम मिळत आहे. हा टीझर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या टीझरमध्ये विकीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. विकी कौशल हा युद्धाच्या मैदानात शत्रूंशी लढताना दिसून येतोय. त्याची कधीही न पाहिलेली बाजू यात दाखवण्यात आली आहे. विकी कौशल छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अंकिता, पॅडी व धनंजयने केलेली अभिजीतची चुगली, रितेशने सत्य दाखवल्यानंतर टीममध्ये फुट, नाराजी अन्…

या चित्रपटासाठी विकी कौशलने बरीच मेहनत घेतली आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन या टीझरमध्ये पहायला मिळतंय. या भूमिकेसाठी त्याने तलवारबाजी आणि घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याबरोबर विकीचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. अशातच आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनेकजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

आणखी वाचा – नवऱ्यासह परदेशात राहणारी पूजा सावंत रक्षाबंधनला भावुक, म्हणाली, “मी तुमच्याबरोबर नाही आणि…”
 

दरम्यान, ‘छावा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून ‘स्त्री-२ ’चे निर्माते दिनेश विजन यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. यामध्ये विकी कौशलबरोबरच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, सुनील शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Tags: Chhaava MovieChhaava Teaser Marathi Newsvicky kaushal
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi : "जान्हवीसाठी एकही कमेंट दाखवली नाही आणि…", टीम बीमध्ये फूट पाडल्याच्या प्रेक्षकांच्या कमेंट्स, म्हणाले, "भांडणं लावून दिली आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.