Pooja Sawant Emotional : बहीण-भावाच्या नात्याचे प्रतीक असलेले रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पोर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन देतो. अशातच आज सर्वत्र रक्षाबंधनचा सण साजरा केला जात आहे. रक्षाबंधननिमित्त सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सामान्य जनतेसह मनोरंजन विश्वातही आजच्या रक्षाबंधनचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच अभिनेत्री पूजा सावंतने आजच्या रक्षाबंधननिमित्त एक खास पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये तिने तिला तिच्याअ भावंडांची आठवण येत असल्याचे म्हटलं आहे. (Pooja Sawant Shared Emotional Post)
अभिनेत्री पूजा सावंतही लग्नानंतर परदेशात गेली आहे. त्यामुळे ती यंदाच्या रक्षाबांधनला भारतात नाही आणि ती भारतात नसल्याने तिला येथील तिच्या भावंडांची आठवण येत आहे, याचनिमित्ताने पूजाने सोशल मीडियावर याबद्दलची एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बहिण रुचिरा व भाऊ श्रेयस सावंतबरोबरचा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसह तिने असं म्हटलं आहे की, “ही माझी पाहिलीच रक्षाबंधन आहे जिथे मी तुमच्याबरोबर नाहीये आणि मला तुमची खूप आठवण येत आहे”.
यापुढे तिने तिच्या भावंडांसह सर्वांना रक्षाबांधणनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तिने तिच्या चुलत भावंडांचाही उल्लेख करत त्यांचीही आठवण येत असल्याचे म्हटलं आहे. पूजाच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, पूजा सध्या परदेशात तिच्या सासरी आहे. पूजाचा नवरा सिद्धेश चव्हाण हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे तीसुद्धा लग्नानंतर काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला गेली. ती कामानिमित्त भारतात येते आणि मग पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून निखिल दामलेपाठोपाठ योगिता चव्हाणही घराबाहेर, सदस्यांना अश्रू अनावर
‘महाराष्ट्राची कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली.