Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा कालचा भाऊचा धक्का चांगलाच गाजला. कालच्या भाऊचा धक्का मध्ये घरातील स्पर्धकांना एकामागून एक धक्के मिळाले. यातील मोठा धक्का म्हणजे काल एकाच दिवशी घरातून दोन सदस्य बाहेर पडले. अभिनेता निखिल दामलेनंतर अभिनेत्री योगिता चव्हाण घराबाहेर पडली. या खास भागात एक स्पेशल खोली उघडण्यात आली. यात स्पर्धकांना एकमेकांचे खरे रंग कळाले. भाऊचा चक्रव्यूह असं या खोलीचे नाव असून यात स्पर्धकांना एकमेकांविषयी माहिती झाले. अशातच अभिजीत सावंतने त्यांच्याविषयीचे गॉसिप ऐकले आणि त्याला विश्वासघात झाल्याचे वाटले. (Bigg Boss Marathi 5 daily update)
गेल्या आठवड्यात भाऊचा धक्कावर अक्षय कुमार, तापसी पन्नूसह अनेक बॉलिवूड कलाकार आले होते. तेव्हा अक्षय कुमारनं घरातला खिलाडी कोण? असं अभिजीत सावंतला विचारताच त्यानं निक्कीचं नाव घेतलं होतं. यावरून अभिजीतच्या टीममधील सदस्यांमध्ये नाराजी पहायला मिळाली होती. त्यावेळी अभिजीतनं खरंतर अंकिताचं नाव घ्यायला हवं होतं असं धनंजय पोवारने म्हटलं होतं. तर अंकितानेही आपलचं नाणं खोटं असल्यानं दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे असं वक्तव्य केलं होतं. अभिजीतच्या या वागण्यावरुन पॅडी, अंकिता व धनंजय यांच्यात गॉसिप सुरु होते आणि याच गॉसिपबद्दल काल अभिजीतला माहीत झाले.
भाऊचा धक्कामध्ये काल चक्रव्यूह ही स्पेशल खोली उघडण्यात आली असून या खोलीत अभिजीतला त्याच्याच टीममधील अंकिता, पॅडी व धनंजय काय म्हणतात हे ऐकवण्यात आले. अंकिता, पॅडी व धनंजयचे हे गॉसिप ऐकून अभिजीतने असं म्हटलं की, “मला खूप वाईट वाटतंय की, ज्यांना मी माझे मित्र मानलं, ज्यांना मी माझे साथी मानले, ज्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही मला हाकललंत तरी मी याच टीममध्ये येईन, ज्या टीमसाठी नेहमीच उभं राहण्याचा प्रयत्न केला, ज्या लोकांसाठी नेहमी उभं राहण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार माझ्या पाठी इतके वाईट असतील याची मला अपेक्षाच नव्हती आणि आता मला त्यांच्या नजरेला नजर देखील द्यावीशी वाटत नाही.”
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून निखिल दामलेपाठोपाठ योगिता चव्हाणही घराबाहेर, सदस्यांना अश्रू अनावर
यापुढे त्याने असं म्हटलं की, “पॅडी, अंकिता व डीपी यांच्यावर मी खूप विश्वास ठेवला होता. इथे येण्याबद्दल मला काहीही असुरक्षितता नव्हती. मी आयुष्यात खूप काही कमावलं आहे. माझ्याकडे खूप काही आहे. पण मला मराठी लोकांचं प्रेम मिळवायचं होतं. त्यामुळे माझ्याबद्दल त्यांचे हे विचार ऐकून मला खूप विश्वासघात झाल्यासारखं वाटलं. माझ्याबद्दल त्यांच्या मनात इतकं काही असेल याचा मी विचारही केला नव्हता”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधील निखिल दामलेचा प्रवास संपला, नेमकं काय चुकलं?
दरम्यान, टीम B मध्ये मोठी ताटातूट झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. या टीममधील निखिल दामले व योगिता चव्हाण घराबाहेर पडले आहेत. अशातच अभिजीतनेही या टीममधील लोकांकडून त्याचा विश्वासघात झाला असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आता येत्या काळात या टीमचा गेम कसा असेल? तुटलेली मनं पुन्हा जुळणार की नाही? याची सर्वजण वाट पाहत आहेत.