सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कतरिना कैफ गरोदर?, शेअर केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, फोटो शेअर करत म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 17, 2024 | 6:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
katrina kaif Pregnancy Rumours

कतरिना कैफ गरोदर?, शेअर केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, फोटो शेअर करत म्हणाली...

बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक जोडी म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ व अभिनेता विकी कौशल. लग्नाआधी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणालाही कळू दिले नाही. पण लग्नानंतर एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्यात त्यांनी अजिबात मागेपुढे पाहिलं नाही. नुकताच विकी कौशलचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला. यावेळी अभिनेत्री कतरिनाने रात्री उशिरा पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळेअभिनेत्रीच्या गरोदरपणाची चर्चा पुन्हा एकदा रंगलेली पाहायला मिळाली. (katrina kaif Pregnancy Rumours)

कतरिना व विकी कौशलच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होतील. या तीन वर्षात अनेकदा अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या बातम्या आल्या आहेत. पण प्रत्येक वेळी या बातम्या अफवा असल्याचं समोर आलं. आता विकीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने तीन फोटो पोस्ट केले आहेत. याशिवाय कॅप्शनमध्ये ३ व्हाईट हार्ट देत ३ केकचे फोटो पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा – “आई-बहिणीबरोबर फिरायला जाते मग नवऱ्याबरोबर का नाही?”, प्रश्न विचारणाऱ्याला अमृता खानविलकरचं उत्तर, म्हणाली, “काही गोष्टी…”

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

या तीन फोटो पोस्ट, तीन केकमुळे नेटकरी अनेक अंदाज बांधताना दिसत आहेत. या तिच्या पोस्टवरुन अभिनेत्री गर्भवती आहे की काय अशी चर्चा सुरु आहे. कतरीना व विकी त्यांच्या मुलाची केव्हा गुडन्यूज देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. कतरिना सध्या लंडनमध्ये आहे आणि अलीकडे विकी तिला भेटायलाही आला होता. तेव्हा ती त्याच्याबरोबर मुंबईला आली नव्हती. अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो तिथल्या एका रेस्टॉरंटमधील आहेत.

आणखी वाचा – अरुंधतीने घर सोडून जाण्यासाठी संजनाचा आरडाओरडा, नको नको ते सुनावलं, आता काय निर्णय घेणार?

आता नेटकरी असा दावा करत आहेत की, अभिनेत्री गरोदर आहे आणि हे जोडपे हे सत्य लपवत आहेत. त्यामुळे कतरिना लंडनमध्ये आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “हे तीन केक आणि तीन हृदय का वापरले गेले?, जणू ती कुटुंबातील तिसऱ्या सदस्याची चाहूल दर्शवित आहे”. तर आणखी एकाने लिहिले आहे की, “ती निश्चितपणे प्रेग्नंट आहे”.तर एकाने लिहिले आहे की, “३-३-३ म्हणजे काय कनेक्शन?”. सध्या कतरीनाकडे कोणताही प्रोजेक्ट नाही पण विकी ‘छावा’ आणि ‘बॅड न्यूज’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Tags: entertainmentkatrina kaifkatrina kaif and vicky kaushalkatrina kaif pregnancy rumours
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Marathi actor Kiran Mane revealed he was offered Lok Sabha election by a big party from india

"लोकसभा निवडणूक लढवण्याची मला ऑफर होती आणि...", किरण मानेंचा मोठा खुलासा, म्हणाले, "उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.