चला हवा येऊ द्या हा शो अनेक वर्ष नित्यनेमाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय, या शो ने अनेक सिनेमे, नाटक, मालिका घराघरात पोचवण्यात मोलाचा वाटा उचला आहे. कलाकाराचं विनोदाचं टाईमिंग याने प्रेक्षकांना कायमच खळखळून हसवलं आहे. कलाकारांच्या उत्तम परफॉर्मेन्स मुळे त्यांनी नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर केलंय आणि म्हणूनच हा शो अजूनही दमदारपणे सुरु आहे. बॉलीवूड सेलेब्रिटी ही या शो मुळे मराठमोळ्या अंदाजात पाहायला मिळाले. त्यामुळे या शो चा क्रेज टिकून आहे. (Bhau Kadam)
चला हवा येऊ द्या म्हंटल्या वर भाऊ कदम हे नाव आपसूकच येत. कलाकरांना ऑन स्क्रीन तर आपण पाहतच असतो. परंतु त्यांच्या सोशलमीडिया वरून आपल्याला त्यांची ऑफस्क्रीन धमाल पाहायला मिळते. पण काही शो खास असतात त्या शो मधल्या पडद्या मागच्या कलाकारांना देखील वेगळी ओळख मिळते. असाच म्हणजे चला हवा येऊ द्याचा वादक तुषार देओल. त्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून काय करू ह्यांचं, अस कॅप्शन देत एक धमाल व्हिडिओ शेअर केलाय.
नेमकं काय केलं भाऊ कदमने?
त्यात भाऊ कदम तुषार नसताना कॅशियो वाजवत आहेत. आणि ते अंकुर ला सांगतात कि ते नाट्यसंगीत वाजवत आहेत यावर अंकुर मजेदार पद्धतीने तुषार कडे त्यांची तक्रार करताना आपल्याला पाहायला मिळतात.अंकुर हा चला हवा येऊद्या च्या माध्यमातून कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. भाऊ कदम अनेकदा सेट वर वाद्य वाजवताना पाहायला मिळतात.आणि अशा अनेक मजेदार गमती जमती ते करत असतात. त्यांच्या ऑन स्क्रीन कामा इतकीच ही, धमाल बघायला देखील प्रेक्षकांना तितकीच आवडते.(Bhau Kadam)
हे देखील पहा: लोचन मजनूची चिमुरडीला भुरळ….. व्हिडीओ होतोय व्हायरल
कलाकारांना त्यांची सध्या चालू असलेली काम यावरून प्रेक्षक लक्षात ठेवत असतात. परंतु, प्रत्येक कलाकार त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी जीव ओतून मेहनत करतो. चला हवा येऊ द्या व्यतिरिक्त भाऊंनी अनेक चित्रपट, मालिका, नाटक, शो केले आहेत. फु बाई फु मधून त्यांच्या नावाला ओळख मिळाली. टाईमपास चित्रपटाचे तिन्ही भाग, पांडू,यांसारखे अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी केलेत. आणि आपल्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक भूमिका कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशीच करण्याचा ते प्रयत्न करतात.
