गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्नाला सासरकडून विरोध होता आणि…”, लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणाला “माझं दिसणं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 2, 2023 | 10:25 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
chala hawa yeu dya fame marathi actor kushal badrike shared post on instagram in caption he say about his marriage)

“लग्नाला सासरकडून विरोध होता आणि…”, लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणाला “माझं दिसणं…”

झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशल हा उत्तम अभिनेता तर आहेच, पण अभिनयाबरोबरच तो एक चांगला लेखकही आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. याचं कारण सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो कधी त्याच्या आयुष्यातील दैनंदिन अपडेट देत असतो, तसंच त्याच्या आगामी प्रोजेक्ट बद्दलही माहिती देत असतो. अशातच त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्याची ही पोस्ट सध्या खूपच चर्चेत आहे. (Kushal Badrike On Instagram)

कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याने नुकतंच एक फोटोशूट केलं असून यातील काही खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणि हे फोटो शेअर करत त्याने या फोटोंना साजेशी पोस्टदेखील लिहिली आहे. त्याच्या या पोस्टमुळे त्याने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. कुशलने या पोस्टद्वारे त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

आणखी वाचा – टीआरपीच्या शर्यतीत हिट मालिकांनाही ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ टाकलं मागे, ‘प्रेमाची गोष्ट’चा आकडा घसरला, ‘ठरलं तर मग’ला कोणतं स्थान मिळालं?

कुशलने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “ही पोस्ट सत्य घटनेवर आधारित आहे. माझ्या लग्नाला तसा माझ्या सासरकडून विरोध होता आणि माझं दिसणं याला कारणीभूत होतं असं मला कायम वाटत राहिलं. आता हे फोटो हाती लागेपर्यंत मी ह्याच ‘गैरसमजुतीत’ होतो. हे फोटो मला मिळाले त्या क्षणी मी सुनयनाकडे गेलो आणि फोटो दाखवून तिला म्हणालो “ह्या मुलाला तुम्ही नाकारल होतं, ह्या अश्या दिसणाऱ्या मुलाला नाकारण्याची तुमची हिंमत झालीच कशी” ? सुनयना मला शांतपणे म्हणाली की, “तू अजूनही तसाच दिसतोस, हल्ली कॅमेरे बऱ्या क्वालिटीचे आलेत.” मग मी आरशात एकदा स्वतःला पाहिलं आणि माझा ‘गैरसमज’ दूर झाला! खरच, तंत्रज्ञानामुळे किती प्रगती झाली आहे यार, बाजारात कॅमेरे चांगले आलेत.”

आणखी वाचा – “अशीवेळ तिच्यावर का यावी?”, आई सीमा देव यांच्या शेवटच्या क्षणांबाबत बोलताना अजिंक्य देव भावुक, म्हणाले, “नंतर नंतर सगळं विसरली आणि…”

दरम्यान त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गायक, संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेता संतोष जुवेकर, शिवाली परब यांसारख्या अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे तर चाहत्यांनीदेखील या पोस्टला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

Tags: entertainmentkushal badrikemarathi actormarathi entertainmentMarathi news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Animal movie box office collection

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, शाहरुख खानच्या 'पठाण'लाही टाकलं मागे, एका दिवसातच कमावले तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.