कलाकारांच्या अभिनयाचे जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत. ही कलाकार मंडळी त्यांच्या चाहत्यांचे नेहमीच भरभरुन मनोरंजन करत असतात. चाहत्यांच्या मनोरंजनात कुठेही ते कमतरता भासू देत नाहीत. तर चाहतेही या कलाकारांवर निखळ प्रेम करतात. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. या कार्यक्रमाने नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन केलं असून आजवर त्यांच्या विनोदी स्क्रिप्टही पसंतीस पडल्या आहेत. गेली दहा वर्ष हा कार्यक्रम अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Kushal Badrike Fan Moment)
या कार्यक्रमातील कलाकारांचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. या कार्यक्रमातून अभिनेता कुशल बद्रिके घराघरांत पोहोचला. कुशलला या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. कुशल गेली अनेक वर्ष या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात त्याने घर केलं आहे. सोशल मीडियावरही कुशल बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. अशातच कुशलने त्याची एक फॅन मुमेंट सोशल मीडियावरुन शेअर केली आहे.
कुशलने विमान प्रवासादरम्यानची एक फॅन मुमेंट शेअर केली आहे. यांत विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कुशलला ग्रीटिंग कार्ड देत त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे आणि त्याच स्वागत केलं आहे. या ग्रीटिंग कार्डवर असं लिहिलं होत की, “आम्हाला तुमचा अभिनय व अभिनयकला मांडण्याची पद्धत नेहमीच आवडते”, असं म्हणत त्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे. ही पोस्ट शेअर करत कुशलने, “आपल्या कामाची दखल कुठेतरी घेतली जात आहे”, असं म्हणत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर कुशल हिंदी मालिकेकडे वळला आहे. सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या नव्या विनोदी मालिकारून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कुशलने मराठी सिनेसृष्टीत जशी छाप पाडली तशी तो आता हिंदी सिनेसृष्टीतही पडणार का याकडे साऱ्यांचा नजरा लागून राहिल्या आहेत.