‘महाभारत’ मालिकेतील या कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज हे गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. त्यांनी पत्नी स्मिता भारद्वाजबरोबर घटस्फोट घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालायात अर्जही केला आहे. दरम्यान त्यांच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे होत आहेत. त्यांनी आपल्या पत्नीवर अनेक आरोप केले आहेत. अनेकदा मुलाखतीदरम्यान आपली पत्नी मुलींना भेटू देत नसल्याचे आरोप केले होते. अशातच आता त्यांनी आपल्या मुलींबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. (Nitish Bhardwaj on daughters)
काही महिन्यांपूर्वी नितीश यांनी त्यांच्या पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनी सांगितलं होतं की, “माझी पत्नी माझा मानसिक छळ करत आहे. त्यामुळे याचा त्रास माझ्या मुलींनाही सहन करावा लागत आहे”, या सर्व प्रकरणाची तक्रार पोलिस स्थानकात केली होती. आता त्यांनी नुकत्याच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखत दिली आहे. त्यांनी या मुलाखतीमध्ये मुलींबद्दल भाष्य केले आहे.
याबद्दल नितीश यांनी सांगितले की, “माझ्या 11 वर्षीय मुली मला बोलल्या की ‘बाबा, तुम्हाला आमचे बाबा म्हणायची लाज वाटते आहे. इतके सर्व करून पण मुलं अशी का करत आहेत असा विचार मी करु लागलो. पण हे सहाजिकच आहे. आई-वडिलांच्या वेगळं होण्याचा परिणाम त्यांच्या मनावर झाला आहे”. नितीश यांच्या बोलण्यातून त्यांची मुलींबद्दल काळजी दिसून येत आहे. पण ते सुद्धा या सर्व प्रकाराने खचले गेले आहेत. सध्या ते यातून बाहेर पडण्यासाठी अध्यात्म, ध्यान, गुरु व आपल्या जवळच्या मित्रांचा आधार घेत आहेत.
नितीश पुढे म्हणाले की, “मी पैशाची मागणी करत आहे हे चुकीचे आहे. उलट मी दिलेले पैसे मी परत मागत आहे जे त्यांनी मला फसवून माझ्याकडून घेतले आहेत”. तसेच त्यांना त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दलही विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, “मला आता धोका मिळाला आहे. त्यामुळे आज मी माझ्या मुलींसाठी लढत आहे. त्यामुळे मी इतर कोणत्या न्याय देवू शकेन की नाही ही माहीत नाही. माझ्यासाठी लग्न ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी माझ्या आई वडिलांना तसेच इतरांना सुखाने संसार करताना पाहिलं आहे.
स्मिता ही नितीश यांची दुसरी पत्नी असून पहिले लग्न मोनिशा पाटीलबरोबर झाले होते. 2005 मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला.