बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मोठं अंगण, घरासमोर शेती अन्…; कोकणात इतकं साधं पण तितकंच सुंदर आहे भाऊ कदम यांचं घर, Inside Video समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 21, 2024 | 10:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bhau kadam home

Video : मोठं अंगण, घरासमोर शेती अन्...; कोकणात इतकं साधं पण तितकंच सुंदर आहे भाऊ कदम यांचं घर, Inside Video समोर

‘झी मराठी वाहिनी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील जनतेला खळखळुन हसायला भाग पाडले. या कार्यक्रमामध्ये काम केलेल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदम यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले. निरागस चेहरा, उत्तम अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग यामुळे त्यांनी या कार्यक्रमाची शान जपली. त्यांच्या सुपरहिट अभिनयामुळे त्यांनी मराठीममध्ये अनेक चित्रपटांमध्येही काम केलेले दिसून आले आहेत. पण एकदा त्यांनी ब्रेक घेत आपल्या कोकणातल्या घराला भेट दिली. त्यांची मुलगी मृण्मयी कदमने नुकताच युट्युब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. (bhau kadam home)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सावडाव हे भाऊ कदम यांचं मूळगाव आहे. त्यांचं कोकणातील घर हे तब्बल ५० वर्ष जुने असून त्यांच्या घराशेजारी छोटीशी विहीर आणि नारळाचं झाड देखील आहे. मातीच्या घरापासून हे घर बांधण्यात आलं असून त्यांच्या घराजवळचं परिसर अतिशय निसर्गरम्य असा आहे. कोकण म्हणजे लाल मातीची कौलारू घरं भाऊचं घर देखील अगदी तसंच आहे. प्रशस्त घर, घरासमोर आंगण, वेगवेगळ्या खोल्या दिसून येत आहेत.

आणखी वाचा – Video : निलेश साबळेच्या नव्या शोचा पहिला प्रोमो समोर, भाऊ कदमसह ओंकार भोजनेही बनला बाई, साडी नेसली अन्…; धमाल व्हिडीओ समोर

तसेच भाऊच्या घराला माळा असलेला देखील पाहायला मिळत आहे. तसेच घराच्या बाहेर भलेमोठे फणसाचे झाड देखील पाहायला मिळत आहे. भाऊंच्या या घराला प्रेक्षकांनी खूप पसंत केले आहे. त्यांनंतर भाऊ गावाची सफर करतानादेखील दिसत आहेत. यावेळी गावाच्या मैदानात मुलांना क्रिकेट खेळताना पाहिल्यानंतर भाऊ यांनी देखील क्रिकेट खेळण्याचा आस्वाद घेतला.

आणखी वाचा – “जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा…”, ईडीच्या कारवाईनंतर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची पोस्ट, म्हणाला, “ही प्रगती आहे आणि…”


त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ते ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर आता ते नीलेश साबळेबरोबर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!!’ या कार्यक्रमात दिसणार आहेत. यामध्ये त्यांच्याबरोबर अभिनेता ओंकार भोजनेची धमाल कॉमेडी पाहायला मिळणार आहे.तसेच काही मराठी चित्रपटांमध्ये दिसण्याचीही शक्यता आहे.

Tags: bhau kadamhomekankavlikokan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Hrishikesh Shelar Wife

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मधील अधिपतीची पत्नीही आहे मराठी अभिनेत्री, दिसते इतकी सुंदर, दीड वर्षांची क्यूट लेक, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.