शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : निलेश साबळेच्या नव्या शोचा पहिला प्रोमो समोर, भाऊ कदमसह ओंकार भोजनेही बनला बाई, साडी नेसली अन्…; धमाल व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 19, 2024 | 2:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dr. Nilesh sable’s Hastay Na Hasaylach Pahije show new promo is out

Video : निलेश साबळेच्या नव्या शोचा पहिला प्रोमो समोर, भाऊ कदमसह ओंकार भोजनेही बनला बाई, साडी नेसली अन्...; धमाल व्हिडीओ समोर

“हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे” असं म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारा अभिनेता, लेखक व दिग्दर्शक डॉ. निलेश साबळेने ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. ‘चला हवा येऊ द्या’ या शोने गेली १० वर्षे जगभरातल्या प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर नुकताच या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून एक्झिट घेतल्यानंतर निलेश आता “हसताय ना? हसायलाच पाहिजे” हा नवा शो घेऊन येत आहे.

गेले काही दिवस या शोचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. तेव्हापासूनच या नवीन शोची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच आता या शोचा आणखी एक प्रोमो समोर आला असून् या प्रोमोमध्ये शोच्या पहिल्या प्रहसनाची (स्किट) झलक पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांचे प्रहसन चालू असल्याचे पाहायला मिळत असून त्यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा” चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसतानाचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

आणखी वाचा – नेत्राने वध करुनही पुन्हा विरोचकाने अस्तिका म्हटल्यावर दिसला नाग, रुपालीला दक्षिण दिशेला बोलावणं, देवी आईच्या लेकी पुढे काय करणार?

त्याचबरोबर या प्रोमोमध्ये अभिनेते भरत जाधव व अलका कुबल यादेखील ओंकार व भाऊ या जोडगोळीच्या विनोदावर हसत आहेत. या स्किटमध्ये ओंकार व भाऊ हे दोघेही स्त्रीपात्र साकारत असून त्यांच्या विनोदांनी प्रेक्षकांनादेखील हसायला भाग पाडले आहे. त्यामुळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या या नवीन प्रोमोला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन’ सीरिजच्या आगामी सीझनच्या शूटिंगला सुरुवात, लवकरच प्रदर्शित होणार तिसरा सीझन, जाणून घ्या…

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे?’ या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. येत्या २७ तारखेपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.  

Tags: Dr. Nilesh SableHastay Na Hasaylach Pahijemarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
mugdha godbole on kshitee jog post

मंगळसूत्र न घालण्यावरुन क्षिती जोगच्या वक्तव्यावर अश्लील कमेंट्स, सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, "पुरषांचं गलिच्छ भाषेत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.