शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा…”, ईडीच्या कारवाईनंतर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची पोस्ट, म्हणाला, “ही प्रगती आहे आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 19, 2024 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
raj kundra instagram post

“जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा...”, ईडीच्या कारवाईनंतर शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची पोस्ट, म्हणाला, "ही प्रगती आहे आणि..."

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा नवरा राज कुंद्रा यांच्या समस्या संपायचे नाव घेत नाहीत. काही कालावधीपूर्वी राजला अश्लील चित्रपटाची निर्मिती केल्याप्रकरणी तुरुगाची हावा खावी लागली होती. त्यानंतर त्याची सुटकाही झाली मात्र आता पुन्हा एकदा तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. गुरुवारी इडीने राज व शिल्पा यांची तब्बल ९७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या संपत्तीमध्ये त्यांचा एक फ्लॅट देखील आहे. जप्तीनंतर राजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून सध्या अधिक चर्चेत आली आहे. (raj kundra instagram post)

इडीच्या कारवाईनंतर राज पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्यांचे वकील प्रशांत पाटील हे त्यांच्या बाजूने केस लढवत आहेत. तसेच या प्रकरणांमध्ये राजवर कारवाई करणं चुकीचं आहे असे देखील त्यांनी म्हंटले. पण आता राजने केलेल्या पोस्टमुळे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एका वाघाचा फोटो लावला आहे. तसेच त्याने लिहिले की, “जेव्हा तुम्हाला अपमानित झाल्यासारखे वाटेल तेव्हा शांत रहायला शिका. ही एक वेगळ्या प्रकारची प्रगती आहे”.

आणखी वाचा – “मंगळसूत्र न घातल्याने असं काय होणार आहे?”, मंगळसूत्र न घालण्यावरुन क्षिती जोगला सुनावल्यानंतर स्पष्ट उत्तर, म्हणाली, “खूप वायफळ वेळ…”

शिल्पाने आतापर्यंत या सर्व प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गुरुवारी इडीच्या कारवाईनंतर ती तिच्या आईच्या घरी जाताना दिसली होती. दरम्यान राजवर झालेल्या कारवाईनंतर त्याच्या वकिलांचे एक स्टेटमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, “आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आदेशाचे पालन करत आहोत. माझ्या अशिलाचे स्वातंत्र्य व संपत्तीच्या रक्षणासाठी मनी लॉंड्रिंग कायद्याअंतर्गत योग्य पावले आम्ही उचलू. मात्र आधी माझे अशिल राज कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होऊ शकत नाही”.

आणखी वाचा – बहूचर्चित ‘द फॅमिली मॅन’ सीरिजच्या आगामी सीझनच्या शूटिंगला सुरुवात, लवकरच प्रदर्शित होणार तिसरा सीझन, जाणून घ्या…

पुढे ते म्हणाले की, “आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही जेव्हा इडीसमोर जेव्हा आमचे म्हणणे मांडू तेव्हा तपास करणाऱ्या यंत्रणादेखील आम्हाला न्याय देतील. आमचा निष्पक्षपातीपणे केलेल्या तपासणीवर पूर्ण विश्वास आहे. गरज पडल्यास आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करु”.

राज कुंद्रा विरोधात आताकोणती कारवाई केली जाणार आणि या सगळ्याशी राज व शिल्पा कसा सामना करणार याबद्दल आता सर्वच स्तरात चर्चा सुरु आहे.  

Tags: instagram postraj kundrashilpa shetty
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Dr. Nilesh sable’s Hastay Na Hasaylach Pahije show new promo is out

Video : निलेश साबळेच्या नव्या शोचा पहिला प्रोमो समोर, भाऊ कदमसह ओंकार भोजनेही बनला बाई, साडी नेसली अन्...; धमाल व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.