सर्वच विनोदी कलाकार हे सोशल मीडियावर आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.अशातच विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणारी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री विशाखा सुभेदार ही तिच्या विनोदी कौशल्याने नेहमीच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते..ती सध्या शुभविवाह या मालिकेतून आपल्या अभिनयाची जादू दाखवतेय. ती सोशल मीडियावर देखील तिच्या मोहक अदाकारीने चाहत्यांना भुरळ घालते.. अश्यातच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला.(vishakha subhedar mhj fan)
अभिनेत्री विशाखा सुभेदार ही सोशल मीडियावर कमालीची ऍक्टिव्ह असून ती सोशल मीडियावर अनेकदा डान्ससोबतच तिच्या शेरो शायरीचे व्हिडीओ देखील शेअर करते. नुकतंच तिने मोका सब को मिलता है असं म्हणत तिने एक खास अंदाजात शेरोशायरी शेअर केली आहे.पण यातील तिचा मोहक अंदाज पाहून चाहत्यांनी तिच्या व्हिडिओला पसंती दिली आणि कमेंटचा वर्षाव केला.
या व्हिडिओतील तिच्या या शेरोशायरीसोबतच तिचा खास लूक पाहायला मिळतोय. तिची हेअर स्टाईलआणि तिच्या या व्हिडिओतील ड्रेसिंगने सर्वांचं लक्ष वेधलय. खरं तर विशाखा ही सध्या विनोदी सोडून अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना पाहायला मिळते. तिला अश्याच वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारायच्या आहेत असे सांगत तिने हास्यजत्रा सोडल्याची पोस्ट शेअर केली होती.
विशाखाची पोस्ट चर्चेत(vishakha subhedar mhj fan)
पण आजही तिच्या या मतावर चाहते नाराज झाले आहेत. तुम्ही हास्यजत्रेत पुन्हा या अशी मागणी अनेकदा चाहते करत आहेत आणि असाच खास प्रश्न तिने शेअर केलेल्या शेरोशायरी या व्हिडिओवर
पाहायला मिळतो. तिचा हा व्हिडीओ आणि लूक पाहून एका चाहत्याने हास्यजत्रा असे म्हणत दुसऱ्या चाहत्याने त्यावर कमेंट करत म्हटलंय ताई कधी जॉईन होणार आहेत तुम्ही हास्यजत्रा मध्ये?, असं विचारलं, यावर विशाखाने नाही.. ओ.. आता वेगळे प्रोजेक्ट्स आहेत ना हातात असं उत्तर दिल. तर या उत्तरावर देखील चाहत्यांनी तिला हास्यजत्रा मध्ये परत या असा सल्ला दिला आहे.
मालिकेसोबतच विशाखा ही गरम किटली या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, तर तिचा या चित्रपटातील हा लूक आहे का हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे,यासोबत ती सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमी तिचे डान्स व्हिडिओ शेअर करते.(vishakha subhedar mhj fan)
तर तुम्हाला तिचा हा व्हिडिओ आवडला का आणि तुम्हाला तिचा लूक देखील कसा वाटलं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा