देशातील प्रसिद्ध चित्रपट निर्मिती प्रशिक्षण संस्था असलेली फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या म्हणजेच एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेता आर. माधवनची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी अभिनेता आर. माधवनचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच माधवनच्या ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. (R Madhavan new FTII President)
या ट्विटमध्ये अनुराग ठाकूर म्हणाले, “एफटीआयआयच्या व गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल मी आर. माधवन यांचे अभिनंदन करतो. मला विश्वास आहे, की तुमचा सिनेसृष्टीतील प्रदीर्घ अनुभव आणि भक्कम नैतिकता या संस्थेत सकारात्मक बदल घडवून आणेल आणि तिला उच्च पातळीवर नेईल. भावी वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.” त्यांच्या या ट्विटवर अभिनेत्याने रिट्विट करत आभार मानले आहे व तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं सांगितलं आहे.
हे देखील वाचा – मृत्यूपूर्वीच्या ‘त्या’ शेवटच्या १५ तासांमध्ये सिद्धार्थ शुक्लाबरोबर नेमकं काय घडलं होतं?, त्याक्षणी रुग्णालयामध्ये नेलं पण…
Heartiest congratulations to @ActorMadhavan ji on being nominated as President of @FTIIOfficial and Chairman of the governing council.
— Anurag Thakur (मोदी का परिवार) (@ianuragthakur) September 1, 2023
I'm sure that your vast experience & strong ethics will enrich this institute, bring positive changes, & take it to a higher level. My best…
एफटीआयआय ही संस्था केंद्र सरकारची स्वायत्त संस्था असून भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते हे याच संस्थेतून घडलेले आहे. याआधी प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर या संस्थेच्या अध्यक्षपदावर होते. पण, ३ मार्च २०२३ रोजी त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. त्यानंतर सहा महिन्यांनी संस्थेला अध्यक्षपद मिळाले असून आर. माधवनचा कालावधी केवळ नऊ महिन्यांचा असणार आहे. (R Madhavan new FTII President)
हे देखील वाचा – जालनामध्ये झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावर ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री भडकली, म्हणाली, “मराठी आरक्षण आणि…”
अभिनेता आर. माधवनबद्दल बोलायचे झाल्यास नुकतेच ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्यात त्याने अभिनयसह लेखन व दिग्दर्शनदेखील केले आहे. शिवाय, त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदी व साऊथच्या चित्रपटांमध्ये काम केलेला आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयाचे कौतुक झाले आहे.