Sandeep Pathak Fan Moment : मराठी नाट्यक्षेत्र दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. अनेक नाटकं कलाकारांकडून सादर केली जात आहेत. प्रेक्षकांच्या आशीर्वादाने आणि कलाकारांच्या मेहनतीने नाटकं अगदी दणक्यात परफॉर्म केली जात आहेत. नाटक विश्वात अनेक मराठी नाटकं आहेत जी महाराष्ट्राबरोबरचं आता परदेशातही गाजू लागली आहेत. अशी नाटकं आहेत ज्यांचे प्रयोग परदेशात होत असतात. यांत सध्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचा यूएसए दौरा सुरु आहे. सध्या या नाटकाची टीम परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे. या नाटकात मराठमोळा अभिनेता आणि विनोदवीर संदीप पाठक महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. संदीप पाठक या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे.
संदीप पाठक हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमीच मनं जिंकतो. तो नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. संदीपला ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही तो बऱ्यापैकी सक्रीय असतो. सोशल मीडियावरील अनेक ट्रेंड तो फॉलो करताना दिसतो तसेच बरेच रिल्स व्हिडीओही तो शेअर करत असतो. इतकेच नव्हे तर एखाद्या विषयावर त्याचं मत देखील तो परखडपणे मांडत असतो.
आणखी वाचा – धनुष व नयनतारा यांच्यातील वाद विकोपाला, एकमेकांचं तोंडही बघेना, एकाच कार्यक्रमात पोहोचले पण…
खेडेगावातून शहरात येऊन आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात छाप पाडणाऱ्या संदीप पाठकची संघर्षगाथा काही नवी नाही. स्वकर्तुत्वाने त्याने सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. संदीप त्याच्या चाहत्यांच्या आठवणीही सोशल मीडियावरुन शेअर करताना दिसतो. अशातच संदीपने नाटकानिमित्तच्या परदेश दौऱ्यात चाहत्यांची एक आठवण शेअर केली आहे. ९० वर्षीय आजी संदीपच्या नाटकाला हजर होत्या. नाटकाच्या प्रयोगानंतर वॉकर घेऊन आलेल्या या ९० वर्षीय आजीची संदीपने भेट घेत आशीर्वाद घेतले.
“९० वर्षांच्या सुमन आजींचे आशिर्वाद मिळाले अजून काय हवं एका कलाकाराला”, असं कॅप्शन देत संदीपने चाहतीबरोबरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘श्वास’, ‘एक डाव धोबीपछाड’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘गैर’, ‘रंगा पतंगा’, ‘पोश्टर गर्ल’ आणि ‘शिक्षणाच्या आयचा घो!’ या चित्रपटांमध्ये संदीपने काम केलं. तर ‘सखाराम बाइंडर’, ‘असा मी तसा मी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकांमधील संदीपच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.