अभिनेता जॅकी भगनानी व अभिनेत्री रकुल प्रीत सिंह २१ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या सर्व विधींना सुरुवात झाली असून सोशल मीडियावर समारंभाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. दक्षिण गोव्यामध्ये आलिशान हॉटेलमध्ये जॅकी व रकुलचा विवाह पार पडणार आहे. जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रकुल व जॅकीच्या लग्नाबाबत रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. दरम्यान दोघांच्या लग्नाचा शाही अंदाज पाहायला मिळत आहे. (Rakul preet singh and Jackky bhagnani wedding)
जॅकी व रकुल यांनी सुरुवातीला भारताबाहेर लग्न करण्याचा विचार केला होता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्यानुसार त्यांनी भारतामध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला.१५ फेब्रुवारीला रकुल व जॅकीची ‘ढोल नाईट’ होती. ‘ढोल नाईट’ नंतरच लग्नाच्या सर्व कार्यक्रमांना सुरुवात झाली. रकुलने या कार्यक्रमासाठी आपल्या कुटुंबासह हजेरी लावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रकुलने सुंदर असा लेहंगा परिधान केला असून आपल्या आई,वडील व भावाबरोबर ती येताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला रकुल व जॅकीने परदेशात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या सहा महिन्यांपासून दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरवात झाली होती. दोघांच्या लग्नाचे आयोजन परदेशात करण्यात येत होते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करुन रकुल व जॅकी यांना भारतामध्येच लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोघांनीही गोव्यामध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता लग्नाचे सर्व विधी गोव्यातील आलिशान अशा ‘ग्रँड आयटीसी’ येथे पार पडणार आहे. लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या थीम पाहायला मिळणार असून लग्न इको फ्रेंडली पद्धतीने करण्यात येणार आहे.
इटाइम्सच्या वृत्तानुसार, रकुल व जॅकी केवळ एका डिझायनरने तयार केलेले कपडे परिधान करणार नसून बॉलिवूडमधील इतर डिझायनरकडून देखील कपडे लग्नासाठीचे कपडे घेणार आहेत. यामध्ये तरुण तहलानी, शांतनु व निखिल, फाल्गुनी शेन पिकॉर, कुणाल रावल व अर्पिता मेहता यांचा समावेश आहे.