रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘अ‍ॅनिमल’ पाठोपाठ रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र २’ या चित्रपटाची चर्चा, रणवीर सिंहची एण्ट्री अन्…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 9, 2023 | 6:23 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bramhastra sequal new update ranveer singh will be appear in this movie

'अ‍ॅनिमल' पाठोपाठ रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र २' या चित्रपटाची चर्चा, रणवीर सिंहची एण्ट्री अन्…

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला रणबीर कपूरचा ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरदेखील चांगलीच कमाई केली होती. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अशा अनेक कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात होत्या. २०२२ मध्ये ‘ब्रम्हास्त्र’चा पहिला ‘शिव’ हा भाग प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. अशातच या दुसऱ्या भागाची सध्या चर्चा सुरू आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात  रणबीरच्या वडिलांची भूमिका एक तरुण अभिनेता साकारणार असल्याचे समजत आहे आणि हा अभिनेता आहे रणवीर सिंग. ‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या भागात रणवीर ‘देवा’ ही भूमिका साकारणार असल्याच्या अफवा अनेकदा पसरल्या होत्या. त्याचबरोबर ही भूमिका हृतिक रोशन किंवा कन्नड अभिनेता यश साकारणार असल्याचं बोललं जात होतं. पण अधिकृतपणे कोणाच्याही नावाला दुजोरा मिळाला नसला तरी, पण आता एका मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर सिंगने ‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या भागात ‘देव’च्या भूमिकेसाठी होकार दिला असल्याचे समजत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

आणखी वाचा – ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा जगभरात डंका, सुपरहिट चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले तब्बल…

काही मीडिया रिपोर्टनुसार, ‘ब्रम्हास्त्र’च्या दुसऱ्या भागात रणवीर हा वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका करण्यासाठी रणवीरची निवड करण्यात आली असून या चित्रपटासाठी त्याचे फायनल कास्टिंगही झाले आहे. २०२५ मध्ये या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे रणवीरच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

आणखी वाचा – सुरुची अडारकरनंतर आणखी एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा विवाहसोहळा संपन्न, शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान गाजला होता. या चित्रपटाने देशभरात २६९.४ कोटी रुपयांची कमाई केली होती तर जगभरात या चित्रपटाने ४३१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. दरम्यान, रणबीर सध्या त्याच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अशातच ‘ब्रम्हास्त्र – २’ च्या बातमीने त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यामुळे त्याच्या ‘ब्रम्हास्त्र’च्या दुसऱ्या भागासाठी त्याचे चाहतेही उत्सुक आहेत.

Tags: entertainmententertainment newsranbir kapoorranveer singh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Aadesh Bandekar Family Time

Video : आदेश बांदेकर नातवाबरोबर लहान होऊन खेळतात तेव्हा…; गोड व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.